इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतात 5G संधीचा शोध घेण्यासाठी मुंबईत दूरसंचार गुंतवणूकदारांची गोलमेज बैठक
Posted On:
29 JUL 2022 7:27PM by PIB Mumbai
मुंबई, 29 जुलै 2022
दूरसंचार गुंतवणूकदारांचे 5G ऑपरेशन्स आणि दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांमधील गुंतवणुकीच्या संधींवर महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी एक गोलमेज बैठक 30 जुलै 2022 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक उद्योगपती, गुंतवणूकदार, बँकर्स, उद्यम भांडवलदार आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात निवडक स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग प्रात्यक्षिकांसह आपले तंत्रज्ञान सादर करतील. 5G युगातील गुंतवणुकीच्या संधी, दूरसंचार क्षेत्रातील सुधारणा आणि दूरसंचार पायाभूत सुविधा तसेच 5G Led वाढीला गती देणे यावरही चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
आघाडीचे दूरसंचार सेवा प्रदाते, उद्योगपती, बँकर्स आणि गुंतवणूकदारांसोबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ही गोलमेज बैठक घेतील आणि दूरसंचार क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या संधीवर चर्चा करतील. माननीय मंत्री गोलमेज अधिवेशनाच्या सांगता सत्रालाही संबोधित करतील.
गुंतवणुकीच्या संधींवरील सत्रात, 5G व्यवस्थेमधील गुंतवणुकीच्या संधी, दूरसंचार उपकरणांचे रेखाटन तसेच उत्पादनाचे स्थानिकीकरण आणि सुरक्षा, भारतातील 5G चा वापर आणि दूरसंचार क्षेत्रात एक मजबूत स्टार्ट-अप व्यवस्था तयार करून नाविन्यपूर्णतेला चालना देणे या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.
दुसर्या सत्रात, दूरसंचार क्षेत्रातील विविध सुधारणांच्या दिशेने सरकारच्या प्रयत्नांची विस्तृत चर्चा केली जाईल. परवाना प्रणाली सुलभ करून, राइट ऑफ वे (RoW) मंजूरी सुलभ करून आणि दूरसंचार क्षेत्रात स्वयंचलित मार्गाने 100% थेट विदेशी गुंतवणुकीद्वारे अनुकूल वातावरण कसे विकसित करता येईल या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.
स्वदेशात विकसित स्टार्ट- अप्सकडून 5G उत्पादनांसह आगामी तंत्रज्ञान वैशिष्ट्ये असलेल्या उत्पादनांची श्रेणी प्रदर्शित केली जाणार असून त्यामध्ये टेक-वॉक आणि उत्पादनांबद्दल थोडक्यात माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सरकारने गेल्या एका वर्षात दूरसंचार सुधारणांचा संच जारी केला आहे. दूरसंचार विभागाने 5G स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे जी जुलै 2022 च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.
गोलमेज बैठकीची विषय पत्रिका येथे पाहू शकता.
* * *
PIB Mumbai | R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846322)
Visitor Counter : 122