ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य’ अभियानांतर्गत काणकोण, गोव्यात चौथा कार्यक्रम संपन्न


गोव्याला वीज क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करावे- सभापती रमेश तवडकर

शनिवारी पणजी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती होणाऱ्या कार्यक्रमात अभियानाची सांगता

Posted On: 28 JUL 2022 5:47PM by PIB Mumbai

गोवा, 28 जुलै 2022


केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून देशभर राबवण्यात येणाऱ्या ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य’ अभियानांतर्गत गोव्यात काणकोण येथे आज चौथा कार्यक्रम संपन्न झाला. विधानसभा सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

अक्षय ऊर्जेचे सर्व स्त्रोत निर्माण करुन गोव्याला वीज क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सर्व विभागांनी मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन सभापती तवडकर यांनी केले. काणकोण तालुक्यात भूमीगत वाहिन्यांमुळे निरंतर वीज पुरवठा होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

वीज विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मुख्य इलेक्ट्रीक अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी दिली.

कार्यक्रमात नाटिकेच्या माध्यमातून वीज बचतीचा आणि विभागाच्या कामासंबंधी माहिती देण्यात आली.

उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य अभियानाचा समारोप शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजनांचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ करुन होणार आहे. पणजी येथील मिनेझिस ब्रांगाझा सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची उपस्थिती असणार आहे.

 

* * *

PIB Panaji | S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1845914) Visitor Counter : 139


Read this release in: English