ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
'गॅस शील्डेड आणि कार्बन किंवा कार्बन-मॅंगनीज पोलादाच्या सेल्फ-शिल्डेड मेटल वेल्डिंगसाठी फ्लक्स कॉर्ड (ट्युब्युलर) इलेक्ट्रोड्सवर गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन तपासण्यासाठी भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांकडून शोध आणि जप्तीची कारवाई
Posted On:
27 JUL 2022 8:58PM by PIB Mumbai
मुंबई, 27 जुलै 2022
'गॅस शील्डेड आणि कार्बन किंवा कार्बन-मॅंगनीज पोलादाच्या सेल्फ-शिल्डेड मेटल वेल्डिंगसाठी फ्लक्स कॉर्ड (ट्युब्युलर) इलेक्ट्रोड्सवर गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन तपासण्यासाठी भारतीय मानक ब्युरो (BIS), मुंबई अधिकाऱ्यांच्या पथकाने 26.07.2022 रोजी नवी मुंबईतील रबाळे येथे IS 15769 नुसार शोध आणि जप्तीची कारवाई केली.
मे. प्रीमियर इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड, (आर 532/533, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, ठाणे बेलापूर रोड, रबाळे, नवी मुंबई – 400701) च्या आवारात टाकलेल्या छाप्यात दिनांक 12.03.2021 च्या गुणवत्ता नियंत्रण आदेश S.O. 1203(E) चे उल्लंघन केलेले आढळून आले. 1.2 मिमी वेल्डिंग वायर-फ्लक्स कॉर्ड वायरचे सुमारे 638 खोके (प्रत्येक खोक्यात 01 स्पूल असलेले) आणि 1.6 मिमी वेल्डिंग वायर- फ्लक्स कॉर्ड वायरचे 57 खोके (01 स्पूल असलेले प्रत्येक बॉक्स) IS 15769 नुसार जप्त करण्यात आले.

भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 नुसार भारतीय मानक ब्युरोच्या मानक चिन्हाचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा 2,00,000 रुपयांपर्यंतच्या किमान दंडाची किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा आहे. गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी बीआयएस द्वारे कारवाई सुरू केली जात आहे. बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने तयार करून ग्राहकांना मोठ्या नफ्यासाठी विकली जात असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. म्हणून, सर्वांना विनंती करण्यात येते कि बीआयएस संकेतस्थळ http://www.bis.gov.in ला भेट देऊन खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावरील ISI चिन्हाच्या सत्यतेची खातरजमा करावी.
नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी कोणत्याही उत्पादनावर ISI चिन्हाचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास ही माहिती प्रमुख, एमयूबीओ-II, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, भारतीय मानक ब्युरो, मानकालय, E9, मरोळ टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400 093 याना कळवावी. अशा तक्रारी hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर ई-मेलद्वारे देखील केल्या जाऊ शकतात. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845659)