ऊर्जा मंत्रालय

‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ कार्यक्रमाचे सांगे येथे आयोजन


अक्षय ऊर्जा ही काळाची गरज- निलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाम मंत्री

Posted On: 27 JUL 2022 5:33PM by PIB Mumbai

गोवा, 27 जुलै 2022

 

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या उज्ज्वल भारत-उज्ज्वल भारत अभियानांतर्गत गोव्यात सुरु असलेल्या अभियानात आज सांगे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

नागरिकांनी राज्यातील उच्च वीज मागणी कमी करण्यासाठी अक्षय ऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन निलेश काब्राल यांनी केले. सौर ऊर्जेवरील साधनांचा वापर केल्यास निश्चितच राज्यासाठी लाभदायक ठरेल, असे ते म्हणाले.  

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी याप्रसंगी नागरिकांना अक्षय ऊर्जेचा वापर करुन राज्याचे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करता येईल, असे आवाहन केले. त्यांनी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना अद्ययावत साधने देण्याची गरज प्रतिपादीत केली.

ऊर्जा मंत्रलायाची गेल्या 8 वर्षांतील कामगिरी आणि 2047 साठीचे व्हिजन यासंदर्भात राज्यात 25 ते 31 जुलै दरम्यान उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज झालेल्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच लघुनाट्याच्या माध्यमातून वीज बचतीचा संदेश देण्यात आला.

गुरुवारी काणकोण येथील कार्यक्रमासाठी विधानसभा सभापती रमेश तवडकर यांची उपस्थिती असणार आहे.

 

* * *

PIB Panaji | S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1845453) Visitor Counter : 119


Read this release in: English