सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई विभागाकडून पुण्याच्या आगा खान पॅलेस इथे कारगिल विजय दिवस साजरा

Posted On: 26 JUL 2022 7:35PM by PIB Mumbai

मुंबई, 26 जुलै 2022

 

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) मुंबई मंडळाने देशाच्या शूर युद्धवीरांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ आज पुण्यातील आगा खान पॅलेस इथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला.

पुणे येथील केंद्रीय राखीव पोलीसांच्या तळेगाव विभागातर्फे नेत्रदीपक बँड पथकाच्या वादनाने आणि सीआरपीएफ तसेच एएसआयच्या मुंबई मंडळ अधिकाऱ्यांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘भारतातील स्वातंत्र्यसैनिक’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली, ज्यात पुण्यातील संत गाडगेबाबा शाळेतील सुमारे 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली. या विद्यार्थ्यांचा सत्कार, सीआरपीएफ चे निरीक्षक जयशंकर अवस्थी आणि एएसआय मुंबई च्या सहाय्यक पुरातत्वशास्त्रज्ञ फाल्गुनी काटकर यांच्या हस्ते करण्यात आला.

 

कारगिल विजय दिवस

1999 च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

मे 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध सुरू झाले आणि राष्ट्रांमधील तीव्र लढाई साठ दिवसांपेक्षा अधिक काळ चालली चालला. शेवटी, त्या वर्षी 26  जुलै रोजी, भारतीय सैन्याचा विजय झाल्याची घोषणा करून, हे युद्ध अधिकृतपणे संपुष्टात आले. भारत विजयी झाला असला तरी युद्धात आपण 527  शूर जीव गमावले, 1363 सैनिक जखमी झाले होते.

सीआरपीएफ पुणेचे निरीक्षक एस. अवस्थी दीपप्रज्वलन करताना

      

 

* * *

PIB Mumbai | S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1845111) Visitor Counter : 126


Read this release in: English