सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छता उद्यमी योजनेची अंमलबजावणी

Posted On: 26 JUL 2022 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जुलै 2022

 

राष्ट्रीय सफाई कर्मचारी, वित्त आणि विकास महामंडळ (एनएसकेएफडीसी) हे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्वोच्च महामंडळ, देशांत, स्वच्छता उद्यमी योजनेची  अंमलबजावणी करत आहे. स्वच्छता आणि सफाई कर्मचारी तसेच मैला वाहून नेण्यापासून मुक्त करण्यात आलेले सफाई कर्मचारी यांच्या शाश्वत उपजीविकेची सोय करण्याच्या उद्देशाने ही अंमलबजावणी होत आहे.

एनएसकेएफडीसीच्या यंत्रणांद्वारे  स्वच्छता उद्यमी योजना -एसयूव्ही अंतर्गत संबंधित निश्चित गटांना सार्वजनिक स्वच्छतेशी उपकरणे/वाहने खरेदी करण्यासाठी वित्तीय सहाय्य प्रदान करणे, तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांनाही सार्वजनिक स्वच्छतेशी उपकरणे/वाहने खरेदी करण्यासाठी वित्तीय सहाय्य देणे, अशी कामे या योजनेअंतर्गत केली जातात. 

स्वच्छता उद्यमी योजनेची 2014-15 या वित्तीय वर्षापासून  आतापर्यंत झालेली प्रगती :--

  1. एनएसकेएफडीसीने आतापर्यंत स्वच्छता उद्यमी योजनेअंतर्गत, 81.79 कोटी रुपयांचे अर्थसाह्य दिले आहे. या अंतर्गत, एनएसकेएफडीसीच्या लक्ष्यित गटातील 2070 लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे.     
  2. एनएसकेएफडीसीने विविध राज्यातील 29 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना 296 विभागांसाठी सार्वजनिक स्वच्छतेशी संबंधित उपकरणे/वाहने खरेदी करण्यासाठी 40.17 कोटी रुपये वितरीत केले  आहेत.

त्या व्यतिरिक्त, एनएसकेएफडीसीने  डोक्यावरून मैला वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनात त्यांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य म्हणून  17.90 कोटी रुपये भांडवली अनुदान देखील या अंतर्गत दिले आहे.  या अंतर्गत 491 लाभार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छतेशी संबंधित 224 उपकरणे/वाहने खरेदी करण्यासाठी हा  निधी देण्यात आला आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.


* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1845087)
Read this release in: English , Urdu