संरक्षण मंत्रालय
कारगिल विजय दिवसानिमित्त मुंबई ते पुणे दौड
Posted On:
26 JUL 2022 5:10PM by PIB Mumbai
पुणे, 26 जुलै 2022
टीम फॅब फाउंडेशन (TFF) हा अशा धावपटूंचा समूह आहे, ज्यांनी आपल्या धावण्याच्या हौशीला, समाजाचे ऋण फेडण्याच्या दातृत्त्वाची जोड दिली आहे. त्यामुळे, विविध दौड आणि धावस्पर्धा असे उपक्रम आयोजित करत, त्यांच्या माध्यमातून, समाजातील गरजू आणि दुर्बल घटकांचे जीवनमान सुधारण्यासाठी ते निधी जमा करत असतात. त्यांच्या या विविध उपक्रमांपैकी विशेष ठळक उपक्रम म्हणजे भूमातेसाठी आणि देशाच्या दिव्यांग सैनिकांच्या राष्ट्रप्रेमाला वंदन करण्यासाठी आयोजित दौड.
भारतीय लष्कराची, सर्वसामान्य नागरिकांकडून सेवा करण्याच्या हेतूने टीम फॅब फाऊंडेशन ने 24 जुलै 2022 रोजी मुंबई ते पुण्यादरम्यान मॅरथॉन दौड आयोजित केली होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि कारगिल विजय दिवस अशा दोन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून ही दौड आयोजित केली होती. 12 जणांच्या या मॅरेथॉन टीमने 120 किमी अंतर दोन दिवसांत पार केले. आणि आज म्हणजेच, 26 जुलै 2022 रोजी हे सगळे धावपटू लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील राष्ट्रीय युद्धस्मारकाजवळ पोहोचले.
लष्कराच्या दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्राचे प्रमुख मेजर जनरल विक्रांत नाईक, VSM, यांनी या सर्व धावपटूंचे स्वागत केले. लष्कराच्या सर्वोच्च बलिदानानंतर त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टीम फॅब फाऊंडेशनच्या वतीने लष्कराच्या पॅरॅलिम्पिक नोडला चार वातानुकूलित यंत्रे देण्यात आली.
* * *
PIB Pune | M.Iyengar/RAghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845025)
Visitor Counter : 135