माहिती आणि प्रसारण मंत्रालय

कारगिल विजय दिवस दिमाखदाररित्या साजरा होणार


याअनुषंगाने हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली, तिरंगा रॅली

पणजीतील कारगिल विजय दिवस समारोह

Posted On: 25 JUL 2022 9:00PM by PIB Mumbai

गोवा, 25 जुलै 2022

 

कारगिल युद्धात भारतीय लष्कराने मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी भारत सरकारचा गोवा येथील केंद्रीय संचार विभाग, 1 गोवा बटालियन राष्ट्रीय छात्र सेना पणजी आणि अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघ यांच्या सहकार्याने 26 जुलै 2022 रोजी कारगिल विजय दिवस साजरा करणार आहे.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, गोव्याचे पोलीस महासंचालक आयपीएस शिर जसपाल सिंग आणि पणजीचे महापौर रोहित मोन्सेराते मंगळवारी सकाळी 10 वाजता पणजीमधील आझाद मैदानातील हुतात्मा स्मारकावर माल्यार्पण समारंभाला उपस्थित राहतील. कारगिल युद्धातील दिग्गज अधिकारी आणि माजी सैनिकही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पुष्पांजली अर्पण केल्यानंतर, महापौर आणि पोलीस महासंचालक तिरंगा रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील जिची सुरुवात आझाद मैदानापासून होऊन कॅम्पलच्या शासकीय युथ हॉस्टेलपाशी तिची सांगता होईल. 

युथ हॉस्टेलमध्ये  मेळावा होणार असून त्यात कारगिलमधील योद्ध्यांचा  सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी  सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.


* * *

PIB Panaji | S.Kakade/VJoshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1844783) Visitor Counter : 100


Read this release in: English