दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

टपाल तिकीटांचा संग्रह आणि माहिती जमा करण्याचा छंद असलेल्यांसाठी टपाल विभागातर्फे दीन दयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना सुरू


पोस्टाच्या तिकीटांचा संग्रह आणि अभ्यासविषयक प्रश्नमंजुषा आणि प्रकल्प मंडल अधिकार्यांकडून राबवला जाणार

Posted On: 25 JUL 2022 7:10PM by PIB Mumbai

गोवा, 25 जुलै 2022


टपाल विभागाने, टपाल तिकीटांचा संग्रह आणि त्याबाबत माहिती जमा करण्यासाठी दीन दयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना (फिलॅटेली अर्थात छंद म्हणून टपाल तिकीटांसंबंधी कौशल्य आणि संशोधन करण्यास प्रोत्साहन शिष्यवृत्ती) सुरू केली असून याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीटांचा संग्रह आणि अभ्यासाबाबत रस निर्माणकरणे,हा आहे. इयत्ता सहावी ते नववीचे शैक्षणिक प्रगती चांगले असलेले विद्यार्थी ज्यांना टपाल तिकीटांचा संग्रह आणि अभ्यास करण्याचा छंद आहे, त्यांना या छंदाबाबत प्रश्नमंजुषा आणि प्रकल्पाच्या आधारे शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल. स्पर्धा मंडल अधिकार्यांकडून हा प्रकल्प  राबवण्यात येईल.

  1. पात्रता अटीः अ) उमेदवार भारतातील मान्यताप्राप्त शाळेचा (इयत्ता सहावी ते नववीचा) विद्यार्थी असावा. ब) संबंधित शाळेत फिलॅटेली  क्लब असावा आणि विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असावा. क) एखाद्या  शाळेत फिलॅटेली क्लब नसेल पण विद्यार्थ्याकडे स्वतःची गोळा केलेली टपाल तिकीटे असतील, तर  त्याचाही विचार केला जाईल. ड) उमेदवाराची  शैक्षणिक कामगिरी उत्तम असावी. शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी निवड करण्याच्या वेळेस, विद्यार्थ्याने नुकत्याच संपलेल्या अंतिम परीक्षेत किमान 60 टक्के गुण किंवा समकक्ष श्रेणी / ग्रेड पॉईंट मिळवलेले असले पाहिजेत. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्यांसाठी 5 टक्के गुणांची सवलत असेल.
  2. निवड प्रक्रिया : निवड प्रक्रियेत दोन स्तरांचा समावेश असेल. (स्तर 1 मध्ये टपाल तिकीटांच्या अभ्य़ासाबाबत लेखी प्रश्नमंजुषा आणि स्तर 2 मध्ये फिलॅटेली प्रकल्प असेल).स्तर 1: टपाल तिकीट अभ्यासाबाबत लेखी प्रश्नमंजुषा प्रादेशिक स्तरावर  स्तर 2: प्रादेशिक स्तरावरील लेखी परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अंतिम निवड होताना अभ्यास प्रकल्प सादर करावा लागेल.
  3. अभ्यासक्रम : फिलॅटेली प्रश्नमंजुषा स्पर्धा ही 50 बहुपर्यायी प्रश्न पुढील विषयांतून असून अचूक पर्याय निव़डावा लागेल.  हे विषय आहेत- ताज्या घडामोडी, इतिहास, विज्ञान, क्रीडा, संस्कृती, भूगोल आणि स्थानिक आणि राष्ट्रीय तिकीटांचा अभ्यास. टपाल तिकीटे गोळा करून त्यांच्या माहितीच्या  अभ्यासाबाबतचा प्रकल्प 4 ते 5 पानांपेक्षा जास्त नसावा. प्रकल्पात, विद्यार्थी  16  पेक्षा अधिक टपाल तिकीटांचा आणि 500 पेक्षा जास्त शब्दांचा उपयोग करू शकणार नाही. प्रकल्प आणि नमुना प्रकल्प यासाठीच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना, लेखी प्रश्नमानुषेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावांच्या घोषणेनंतर  मंडल अधिकाऱ्यांकडून जारी केल्या जातील.  

या स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंदाजे तारीख 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022  या दरम्यान असेल.  वरिष्ठ टपाल अधीक्षक कार्यालय, गोवा विभाग, पहिला मजला, टपाल भवन, पणजी-गोवा -403001 येथे अर्ज पाठवायचे आहेत.  

 

* * *

PIB Panaji | S.Kakade/U.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1844743) Visitor Counter : 224


Read this release in: English