ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऊर्जा मंत्रालयाकडून 'उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य' महोत्सवाचे गोव्यात आयोजन

प्रविष्टि तिथि: 23 JUL 2022 4:15PM by PIB Mumbai

 

पणजी, 23 जुलै 2022

देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून ऊर्जा मंत्रालयाने उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य-पॉवर @ 2047’ महोत्सवाचे आयोजन केले आहे. गोव्यात यानिमित्त 25 ते 30 जुलै दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 25 जुलै रोजी पेडणे येथील कार्यक्रमात वीज मंत्रालयाच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा, ऊर्जा संकल्पनेवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथनाट्ये सादर करण्यात येणार आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री रामकृष्ण ढवळीकर यांची याप्रसंगी उपस्थिती असणार आहे. यानंतर डिचोली, सांगे, काणकोण येथे कार्यक्रम होणार आहेत. 30 जुलै रोजी पणजी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

उज्वल भारत उज्ज्वल भविष्यपॉवर @2047’ महोत्सव अधिक लोकसहभागासाठी आणि वीज क्षेत्राच्या कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 25-30 जुलै या आठवड्यात देशभर साजरा करण्यात येणार आहे. पॉवरग्रीड गोवा परिक्षेत्राचे अनिल बाबू नायक, मयुर हेदे आणि नासीर हुसेन शेख या महोत्सवासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1844198) आगंतुक पटल : 186
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English