आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशातील कर्करोग विषयक संशोधन आणि उपचार यांना चालना
कर्करोग हा एनपीसीडीसीएस कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहे; एनपीसीडीसीएस कार्यक्रमाअंतर्गत 685 जिल्हा एनसीडी दवाखाने, 266 जिल्हा डे केयर सेंटर्स आणि 5451सामाजिक आरोग्य केंद्राच्या एनसीडी दवाखान्यांची उभारणी करण्यात आली आहे
केंद्र सरकारने कर्करोगाच्या तृतीय श्रेणी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी तृतीय श्रेणी कर्करोग उपचार सुविधा योजनेला मंजुरी दिली आहे
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2022 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2022
भारत सरकार देशातील कर्करोग विषयक संशोधन आणि उपचार यांना अधिक चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या संदर्भात, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे हरियाणामधील झज्जर येथे राष्ट्रीय कर्करोग संस्था आणि कोलकात्यामध्ये चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्था(पहिला आणि दुसरा परिसर) यांची उभारणी करण्यात आली आहे.
एनपीसीडीसीएस अर्थात कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि पक्षाघात यांचा प्रतिबंध तसेच नियंत्रण यासाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना तंत्रज्ञानविषयक आणि आर्थिक पाठबळ पुरविते. हा कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा भाग असून, राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या प्रस्तावांनुसार आणि साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार हे पाठबळ देण्यात येते. कर्करोग हा या एनपीसीडीसीएस कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहे. हा कार्यक्रम कर्करोगासह असंसर्गजन्य रोगांच्या उपचारासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, आरोग्यविषयक माहितीचा प्रसार आणि कर्करोग प्रतिबंधा बाबत जनजागृती, सुरुवातीच्या टप्प्यावरील निदान, रोग व्यवस्थापन आणि योग्य पातळीवरील आरोग्य सुविधांकडे रुग्णाची शिफारस या घटकांवर लक्ष केंद्रित करतो. एनपीसीडीसीएस कार्यक्रमाअंतर्गत 685 जिल्हा एनसीडी दवाखाने, 266 जिल्हा डे केयर सेंटर्स आणि 5451सामाजिक आरोग्य केंद्राच्या एनसीडी दवाखान्यांची उभारणी करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने कर्करोगाच्या तृतीयक सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी तृतीयक कर्करोग उपचार सुविधा योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत 19 राज्य कर्करोग संस्था आणि 20 तृतीयक कर्करोग उपचार सुविधा केंद्रांच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे.
केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1842875)
आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English