अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली आढावा बैठक : राज्यांनी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली समवेत माहितीची वेळेवर देवाणघेवाण करण्यावर अधिक भर

प्रविष्टि तिथि: 18 JUL 2022 7:10PM by PIB Mumbai

मुंबई, 18 जुलै 2022

  

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) विभागाने आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ,T1 इथे ताज सांताक्रूझ, इथे बँकांच्या कामगिरीसंदर्भात आढावा बैठक आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारांसोबत बैठक घेतली. व्यय विभागाअंतर्गत असलेल्या लेखा नियंत्रक कार्यालयाच्या पीएफएमएस विभागाच्या अतिरिक्त लेखा महानियंत्रक धरित्री पांडा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.  

या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांच्या  निधी वितरणा संदर्भातली  नवीन पद्धत आणि  सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली बरोबर कोषागार समन्वयन या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली.  राज्य सरकारांनी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीला माहितीची देवाणघेवाण वेळेवर करावी जेणेकरून विश्वासार्ह आणि अचूक आर्थिक अहवाल सुनिश्चित होईल आणि या प्रणालीत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, यावर या बैठकीत भर देण्यात आला.      

बँकिंग प्रणालीला नवीन बदलांना आत्मसात करता यावे या उद्देशाने महत्वाचे  प्रमुख  कामगिरी निर्देशक (KPIs) आणि एकल नोडल खाती  या मुद्द्यांवर  बँकांच्या कामगिरी बद्दलच्या आढावा बैठकीत अधिक भर देण्यात आला.  या बैठकीला सह लेखा महानियंत्रक, पीएफएमएस विभाग, नवी दिल्ली, अमिताभ त्रिपाठी, एनआयसी- पीएफएमएस चे तंत्रज्ञ  आणि गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानचे राज्य वित्त अधिकारी देखील उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, येस बँक आणि इंडसइंड बँक, या 13 प्रमुख बँका,बँकिंग पुनरावलोकनात सहभागी झाल्या होत्या.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1842454) आगंतुक पटल : 207
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English