रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ

Posted On: 17 JUL 2022 8:09PM by PIB Mumbai

नागपूर, 17 जुलै 2022

 

‘स्वातंत्र्याच्या  अमृतमहोत्सवाच्या अंतर्गत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन  करत निश्चित करण्यात आलेल्या 114 ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवसात एका दिवसात सुमारे 1.25 लाख रोपांची लागवड केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे या  देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू,  एलआयटीचे संचालक,  एनएचएआय-भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे  सल्लागार, प्रसारमाध्यमे आणि नागरिकांच्या उपस्थितीत गडकरी यांनी वृक्षारोपण केले. 

भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणाऱ्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2022 पर्यंत 75 लाख रोपे लावण्याचे एनएचएआयचे उद्दिष्ट आहे.

यानिमित्त गडकरी यांनी एका डिजिटल  कार्यक्रमाचा प्रारंभ केला.   आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्रालयाने हाती घेतलेल्या वृक्षारोपणाच्या प्रयत्नांची माहिती दिली आणि वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्याच्या गरजेवर प्रकाश टाकत लोकांनी पुढे येऊन या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

वृक्षारोपणात पारदर्शकता राखण्यासाठी हरितपथ हे  डिजिटल अॅप विकसित करण्यात आले असून यात या मोहिमेत लावलेल्या रोपांचे स्थान आणि वास्तविक छायाचित्र दिसते. 

आतापर्यंत एनएचएआयने 2.75 कोटी झाडे लावली आहेत. 2021-22 मध्ये  एनएचएआयने 72 लाख रोपे लावली होती तर या वर्षात 75 लाख रोपे लावली जाणार आहेत. या कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक काम विभाग व   एनएचएआयचे अधिकारी, ग्रीन फाउंडेशनचे सदस्य आणि एलआयटीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते.

राष्ट्रीय महामार्ग  44 वरील जामठा येथे झालेल्या  वृक्षारोपणात एनएचएआयचे सल्लागार श्री जैन, सामाजिक वनीकरण अधिकारी, एनएचएआयचे सल्लागार श्री जैन, सामाजिक वनीकरण अधिकारी, एनएचएआयचे अधिकारी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी आणि सामाजिक संस्था - निश्चय, कल्पवृक्षचे सदस्य आणि शालेय विद्यार्थी  सहभागी झाले होते.


* * *

PIB Mumbai | Jaydevi PS/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1842229) Visitor Counter : 145


Read this release in: English