संरक्षण मंत्रालय

एव्हियॉनिक्सच्या स्वदेशीकरणाविषयी चर्चासत्राचे (Avisem 22) आयोजन

Posted On: 16 JUL 2022 5:45PM by PIB Mumbai

 

भारतीय हवाई दलाने एव्हियॉनिक्स म्हणजे विमानातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि भाग यांच्या स्वदेशीकरणाविषयी AVISEM – 22 या चर्चासत्राचे 18 आणि 19 जुलै रोजी आयोजन केले आहे. या चर्चासत्राची एव्हियॉनिक्सचे स्वदेशीकरण ही संकल्पना मॉड्युलर ओपन सिस्टम आर्किटेक्चर फ्रेमवर्क म्हणजे परवडण्याजोग्या आणि अंगिकार करता येणाऱ्या तंत्रज्ञान आणि व्यवसाय धोरणावर आधारित आहे. हवाई मुख्यालयाच्या संचालनालयाने हवाई दलाच्या पुण्याच्या दुरुस्ती तळावर  या कार्यक्रमाचे आयोजन केले असून भारतीय हवाई दलाच्या देखभाल विभागाचे प्रमुख हवाई अधिकारी एयर मार्शल विभास पांडे या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांचे प्रतिनिधित्व करणारे नामवंत शास्त्रज्ञ, या उद्योगातील प्रमुख उद्योजक, हवाई दलाच्या मुख्यालयातील आणि देखभाल विभागाच्या मुख्यालयातील भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय हवाई दलाच्या सर्व दुरुस्ती तळावरील प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत. भारतीय हवाई दलाला स्वदेशी विकासासाठी उपयुक्त असलेल्या परवडण्याजोग्या आणि अंगिकार करता येणाऱ्या तंत्रज्ञान आणि व्यवसायामध्ये आपल्या क्षमतांचे दर्शन यामध्ये सहभागी होणाऱ्या सक्षम उद्योग आस्थापनांकडून करण्यात येईल. आत्मनिर्भरतेची संकल्पना पुढे नेत, एव्हियॉनिक्स सामग्रीचा पुरवठा आणि देखभालीसाठी परदेशी मूळ सामग्री उत्पादकांवरील अवलंबित्व कमी करण्याचे धोरण विकसित करणे हा या चर्चासत्राचा उद्देश आहे. व्यावसायिक वापरात नसलेली उत्पादने आणि त्यांचे तंत्रज्ञान, परवडण्याजोग्या आणि अंगिकार करता येणाऱ्या तंत्रज्ञानाचा पर्याय म्हणून वापरण्याच्या धोरणाच्या शक्यतेची पडताळणी करणाऱ्या संकल्पना सत्रांचे आयोजन करून हा उद्देश साध्य करण्याचा चर्चासत्राचा प्रयत्न आहे. एकंदरच मूळ सामग्री उत्पादकांकडून पुरवल्या जाणाऱ्या एव्हियॉनिक्स सामग्रीला पर्याय म्हणून परवडण्याजोग्या आणि अंगिकार करता येणाऱ्या तंत्रज्ञानाचे एकात्मिकरण, प्रमाणीकरण आणि पात्रता यासाठीची प्रक्रिया तयार करण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

***

S.Kakade/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1842022) Visitor Counter : 133


Read this release in: English