अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई क्षेत्राच्या केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने 100 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा बनावट आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडिट) व्यवहार आणला उघडकीस

Posted On: 15 JUL 2022 9:43PM by PIB Mumbai

मुंबई, 15 जुलै 2022

 

मुंबई क्षेत्राच्या  केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त बनावट आयटीसीचा पुरवठा करून  लाभ घेणाऱ्या  इनपुट टॅक्स क्रेडिटचे जाळे उघडकीस आणले आहे. यात जीएसटी चुकवेगिरीसाठी  585 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या जारी करून  20 हून अधिक बनावट संस्थांचा वापर करण्यात आला आहे.  वापर आणि लाभ घेणाऱ्या  संबंधित व्यवहारांची बनावट आयटीसी टोळी चालवणाऱ्या दोन व्यक्तींना आज, 15 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली आहे.कपडे, ट्रंक, पेट्रोलियम तेल इत्यादी विविध वस्तूंचे व्यवहार करणाऱ्या मेसर्स सिटीकेम इंडिया लि. आणि  मेसर्स एचएम मेगाब्रँड प्रा. लिमिटेड, एचएम एंटरप्रायझेस आणि मेसर्स जनरल केमिकल इंडस्ट्रीज या इतर तीन कंपन्यांचे मालक बनावट पावत्यांच्या बळावर बनावट आयटीसीचा लाभ मिळवून आणि त्याचा वापर करून जीएसटीची  चोरी करत होते.

प्रधान मुख्य आयुक्त मुंबई क्षेत्राच्या केंद्रीय गुप्तचर विभागाने सखोल माहिती आणि विश्लेषणाच्या माध्यमातून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई केंद्रीय  आयुक्तालयाच्या कर चोरीविरोधी अधिकाऱ्यांनी  तपास सुरू केला होता. वर उल्लेख केलेल्या  कंपन्या सुमारे पाच कंपन्यांच्या मालकाद्वारे व्यवस्थापित केल्या जात होत्या आणि वस्तू आणि सेवांची विक्री केली नसतानाही 34.38 कोटीं रुपयांच्या  बनावट आयटीसीचा लाभ घेत असल्याचे  आणि वापर करत असल्याचे तपासात आढळून आले. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावावर सुमारे 216 कोटीं रुपयांची बनावट देयके  जारी करून  करचोरी करणे  हे सीजीएसटी  कायदा, 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन आहे.

आणखी एक व्यक्ती, जी 14 बनावट कंपन्या चालवत होती, त्याने वस्तू आणि सेवांच्या विक्रीशिवाय40.46 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी ) वापरून त्याचा लाभ घेतला होता, सीजीएसटी  कायदा, 2017 च्या तरतुदींचे घोर उल्लंघन आहे. ही कर चोरी  करण्यासाठी सुमारे 369 कोटी रुपयांची  बनावट देयके तयार करण्यात आली.वर नमूद केलेल्या चार बनावट कंपन्यांनी  जारी केलेल्या पावत्यांच्या आधारावर  40.46 कोटी रुपयांची बनावट  आयटीसी प्राप्त केले आणि 25.92 कोटीं रुपयांचे आयटीसी  विविध कंपन्यांना  दिले, असे या कंपन्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या प्रमुखाने मान्य केले आहे.

बनावट आयटीसी  टोळीमधील एका प्रमुख व्यक्तीची डीआरआय, सीबीआयने यापूर्वीच चौकशी केली होती आणि अखेरीस 2018 मध्ये 2300 कोटी रुपयांच्या हवाला प्रकरणात सक्त वसुली   संचालनालयाने त्याला अटक केली होती, तसेच ही व्यक्ती  बनावट आयटीसी वापरून त्याचा लाभ घेत होती यामुळे  सरकारी तिजोरीची फसवणूक होत आहे,हे तपासातून समोर आले आहे.

दोन्ही आरोपींना अटक करून आज 15 जुलै 2022 रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

 

R.Aghor/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1841934) Visitor Counter : 144


Read this release in: English