पर्यटन मंत्रालय

कथाकथनातून अध्ययनः पर्यटन मंत्रालयाने कथा यात्रा उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना केले मंत्रमुग्ध

Posted On: 08 JUL 2022 7:05PM by PIB Mumbai

मुंबई, 8 जुलै 2022

 

इंडिया टुरिझम मुंबई या पर्यटन मंत्रालयाच्या(भारत सरकार) प्रादेशिक कार्यालयाने आज मुंबईतील केंद्रीय विद्यालय क्रमांक दोन, कुलाबा, नेव्ही नगर येथे  माध्यमिक शाळेच्या 150 विद्यार्थ्यांसाठी कथाकथनाचे सत्र आयोजित केले होते.

या कथा यात्रेचे उद्दिष्ट भारत सरकारचा एक भारत श्रेष्ठ भारत (ईबीएसबी) हा उपक्रम आणखी पुढे नेण्याचा आहे. आजच्या कथायात्रा सत्रामध्ये (कथाकथन सत्र) महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यांमधील संबंध आणि कथाकथनाची कौशल्ये अधोरेखित करून या दोन रांज्यांच्या वैभवाची माहिती देण्यात आली.

मुंबईतील धी(Dhi) प्रकल्पाच्या पथकाने दृक्श्राव्य माध्यम आणि नाट्यरूपांतराच्या  सहाय्याने कथाकथन सत्राचे आयोजन केले आणि त्यामध्ये मुलांना गुंतवून ठेवले. सत्रादरम्यान मनोरंजक गोष्टींमध्ये मग्न झालेल्या विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांतील इतिहास, संस्कृती, खाद्यपदार्थ, कला, नृत्याचे स्वरूप, स्मारक, पर्यटन आकर्षणे याबद्दल अमूल्य माहिती घेतली. या सत्रामुळे बालकांच्या कोवळ्या मनांना या दोन राज्यांबाबत शोध, परीक्षण आणि संस्कृतींशी जोडून घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.   सत्राच्या अखेरीस, तिथल्या तिथेच एक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली आणि विजेत्यांना इनक्रेडिबल इंडिया मर्कंडाईज हे पुरस्कार म्हणून वितरित करण्यात आले.

कथा यात्रा  उपक्रमाचा उद्देश भारतातील समान आणि वेगळी वैशिष्ट्ये असलेल्या राज्यांमधील कथा समोर आणून जागृती करणे तसेच देशाच्या युवकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करण्याचा आहे. कथा यात्रा ही भौगोलिक विविधतेनुसार देशातील कथा आणि कथाकथनाच्या विविध पद्धती समोर आणण्याची आगळी वेगळी अशी संकल्पना आहे. धी प्रकल्पाने इंडियाटुरिझम मुंबईसाठी केलेल्या कथायात्राचा उद्देश भारतातील ज्ञात आणि अज्ञात कथांद्वारे स्थानिक दंतकथा आणि आख्यायिका, स्वातंत्र्याच्या खुणा, प्रादेशिक कला आणि संस्कृती, परंपरा, पद्धती, स्थापत्य कला, क्रीडा आणि संगीत, खाद्यपदार्थ आदींचा शोध घेण्याचा आहे.


* * *

PIB Mumbai | S.Patil/U.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1840174) Visitor Counter : 191


Read this release in: English