आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील कोविड-19 प्रतिबंधक लस उपलब्धतेविषयक अद्ययावत माहिती
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसींच्या 193.53 कोटीहून अधिक मात्रांचा पुरवठा
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप न वापरलेल्या 11.36 कोटीहून अधिक मात्रा शिल्लक आणि लसीकरणासाठी उपलब्ध
Posted On:
01 JUL 2022 9:17AM by PIB Mumbai
देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021पासून सुरूवात झाली. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021पासून सुरू झाला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टिने लसींची अधिक उपलब्धता, लसीच्या साठ्यांविषयी आगाऊ सूचना आणि लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करणे या माध्यमातून लसीकरण मोहिमेची गती वाढवण्यात आली आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा विनामूल्य पुरवठा करत त्यांना सहाय्य करत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्यात, केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे उत्पादित 75 टक्के लस खरेदी करून या लसींचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य) पुरवठा करत आहे.
VACCINE DOSES
|
(As on 1st July 2022)
|
SUPPLIED
|
1,93,53,58,865
|
BALANCE AVAILABLE
|
11,36,58,910
|
आतापर्यंत भारत सरकारने राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना 193.53 कोटी हून अधिक (1,93,53,58,865) लसींच्या मात्रांचा (विनामूल्य) आणि थेट राज्य खरेदी श्रेणीद्वारे पुरवठा केला आहे.
कोविड प्रतिबंधक लसींच्या 11.36 कोटीहून अधिक (11,36,58,910) शिल्लक आणि न वापरलेल्या मात्रा अजूनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत.
***
ST/UK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838493)
Visitor Counter : 154