दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टपाल खात्याकडून आधार नोंदणीसाठी 02 जुलै 2022 रोजी विशेष मोहीम

प्रविष्टि तिथि: 29 JUN 2022 3:35PM by PIB Mumbai

 

पणजी, 29 जून 2022

टपाल खात्याकडून गोव्यात शनिवार, 02 जुलै 2022 रोजी मोबाईल क्रमांक-आधार जोडणी आणि पाच वर्षांखालील बालकांची आधार नोंदणी यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

अल्तो-पर्वरी टपाल मुख्य कार्यालय, बेतकी टपाल शाखा, म्हार्दोळ टपाल शाखा, म्हापसा टपाल कार्यालय, कळंगूट टपाल कार्यालय या उत्तर गोवा जिल्ह्यातील आणि वास्को टपाल कार्यालय, कुंकळ्ळी टपाल कार्यालय, सांकवाळ टपाल शाखा, कोला टपाल शाखा या दक्षिण गोवा जिल्ह्यातील टपाल कार्यालयांमध्ये 02 जुलै 2022 रोजी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. पाच वर्षांखालील बालकांची आधार नोंदणी निःशुल्क आहे.

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1837889) आगंतुक पटल : 191
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English