दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल खात्याकडून राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन
Posted On:
27 JUN 2022 5:20PM by PIB Mumbai
पणजी, 27 जून 2022
टपाल खात्याकडून चालू आर्थिक वर्षासाठी असलेल्या “भारतासाठी व्हिजन 2047” संकल्पनेतून ‘ढाई अक्षर’ या राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 01 जुलै ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत पत्रलेखन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रलेखन इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेत करता येईल. स्पर्धेसाठी लिहिलेली पत्रे मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई 400001 या पत्त्यावर पाठवावीत.
पत्रलेखन स्पर्धा दोन गटांत आयोजित करण्यात आली आहे. 18 वर्षापर्यंतचा वयोगट (आंतर्देशीय पत्र आणि लिफाफा) आणि दुसरा गट 18 वर्षांवरील (आंतर्देशीय पत्र आणि लिफाफा) असा आहे. A-4 कागदावर लिफाफा श्रेणीसाठी 1000 शब्दांपेक्षा जास्त शब्दांचा मजकूर नसावा, तसेच आंतर्देशीय पत्रासाठी 500 शब्दांपेक्षा अधिक मजकूर नसावा. केवळ हस्ताक्षरातील पत्रे स्पर्धेसाठी स्वीकारण्यात येतील. सहभागितांनी 01/01/2022 रोजी वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 18 वर्षापेक्षा अधिक असे लिहून वयाचा दाखला जोडणे गरजेचे आहे. विभागीय पातळीवरील अंतिम निकाल 25 डिसेंबर 2022 पर्यंत जाहीर केले जातील.
विभागीय पातळीवरील पारितोषिक:
पारितोषिक श्रेणी
|
बक्षिसाची रक्कम
|
प्रथम (सर्व श्रेणींतील)
|
रु.25,000/-
|
द्वितीय (सर्व श्रेणींतील)
|
रु.10,000/-
|
तृतीय (सर्व श्रेणींतील)
|
रु.5,000/-
|
राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिक:
पारितोषिक श्रेणी
|
बक्षिसाची रक्कम
|
प्रथम (सर्व श्रेणींतील)
|
रु.50,000/-
|
द्वितीय (सर्व श्रेणींतील)
|
रु.25,000/-
|
तृतीय (सर्व श्रेणींतील)
|
रु.10,000/-
|
* * *
PIB Panaji | S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837324)