सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून आयकॉनिक  सप्ताहाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 26 JUN 2022 4:45PM by PIB Mumbai

 

 

क्षेत्रीय परीचालन विभाग महाविद्यालयीन/विद्यापीठातील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी अधिकृत आकडेवारीवर आधारीत देशव्यापी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय येत्या 27 जून-ते 3 जुलै 2022 दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयकॉनिक  सप्ताह साजरा करणार आहे.आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवाचा एक भाग म्हणून, क्षेत्रीय परीचालन विभाग महाविद्यालय/विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी अधिकृत आकडेवारीवर देशव्यापी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करत आहे.

हा उपक्रम, मुंबई येथील क्षेत्रीय परीचालन विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने, लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय महाविद्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई आणि जवळपासच्या परिसरातील  विविध महाविद्यालये/विद्यापीठातील सुमारे 100 विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.  सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल आणि विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे दिली जातील.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या उत्सवात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याच्या भावनेने,अधिकृत आकडेवारीबद्दल जागरुकता वाढवणे आणि भारतीय अधिकृत सांख्यिकी प्रणालीच्या विविध पैलूंबद्दल तरुणांच्या मनात प्रबोधन करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

***

N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1837121) आगंतुक पटल : 164
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English