आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे लसींच्या उपलब्धतेविषयी ताजी माहिती


193. 53 कोटीहून अधिक कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात आल्या

12.02 कोटीहून अधिक न वापरलेल्या आणि शिल्लक लसींच्या मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध

Posted On: 26 JUN 2022 9:49AM by PIB Mumbai

देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021 पासून सुरूवात झाली. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरू झाला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टिने लसींची अधिक उपलब्धता, लसींच्या साठ्याविषयी आगाऊ सूचना आणि लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करणे या माध्यमातून लसीकरणाची गती वाढवण्यात आली आहे.

देशव्यापी लसीकरणाचा भाग म्हणून भारत सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसींचा विनामूल्य पुरवठा करत त्यांना सहाय्य करत आहे. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्यात, केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे उत्पादित 75 टक्के लसी खरेदी करून या लसींचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य) पुरवठा करत आहे.

VACCINE DOSES

 

(As on 26th June 2022)

 

SUPPLIED

 

1,93,53,58,865

 

BALANCE AVAILABLE

 

 

12,02,15,630

 

आतापर्यंत भारत सरकारच्या माध्यमातून आणि थेट राज्य खरेदी श्रेणीद्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 193.53 कोटी (1,93,53,865) कोविड लसींचा पुरवठा (विनामूल्य) करण्यात आला आहे.

कोविड प्रतिबंधक लसीच्या न वापरलेल्या 12.02 कोटीहून अधिक (12,02,15,630) मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असून लसीकरणासाठी उपलब्ध आहेत.

***

Jaydevi PS/UK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1837056) Visitor Counter : 158