सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाकडून पणजी येथे 27 जून रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषेचे आयोजन
Posted On:
24 JUN 2022 3:03PM by PIB Mumbai
पणजी, 24 जून 2022
केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाकडून 27 जून- 3 जुलै 2022 दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयकॉनिक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने मंत्रालयाची क्षेत्रीय कार्यालये प्रत्येक राज्यांत महाविद्यालयीन विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ‘अन्वेषा 2022’ या प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे.
गोवा कार्यालयाने सोमवार, 27 जून रोजी पाटो, पणजी येथील बहुउद्देशीय सभागृहात महाविद्यालीयन आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषेचे आयोजन केले आहे. विजय सक्सेना, संचालक, नियोजन, सांख्यिकी आणि मुल्यमापन विभाग, गोवा सरकार हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सुमारे 70 विद्यार्थी प्रश्नमंजूषेत सहभागी होतील. सहभागितांना विभागाकडून प्रमाणपत्र आणि विजेत्या चमूला पारितोषक प्रदान केले जाणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याच्या भावनेने, सांख्यिकी मंत्रालयाच्या कामकाजाबद्दल जागरुकता वाढवणे आणि भारतीय अधिकृत सांख्यिकी प्रणालीच्या विविध पैलूंबद्दल युवकांमध्ये प्रबोधन करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836731)