संरक्षण मंत्रालय

21 जून 2022 रोजी 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस


भारतीय लष्कराच्या पुणे इथल्या दक्षिण कमांडच्या मुख्यालयातील तुकड्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस

Posted On: 21 JUN 2022 5:34PM by PIB Mumbai

पुणे , 21 जून 2022

भारतीय लष्कराच्या पुण्यातील दक्षिण कमांडच्या मुख्यालयातील तुकड्यांनी मोठ्या उत्साहाने 21 जून 2022 रोजी " आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन" कार्यक्रमात सहभाग घेतला. पुण्यातील मिल्खा सिंग क्रीडा संकुलात "सामान्य योग प्रोटोकॉल" नुसार सर्वांनी मिळून योगाभ्यास केला. यामध्ये मोठ्या संख्येने अधिकारी, कनिष्ठ अधिकारी आणि इतर दर्जाचे अधिकारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कुटुंबे आणि मुलेही सहभागी झाली होती.

ताणतणाव कमी करणारे आणि एक प्रभावी पर्यायी निरामय शारीरिक व्यवस्था म्हणून या प्राचीन जुन्या योगासनांचे महत्त्व भारतीय सैन्याने जाणले आहे. आपल्या सैनिकांना कामावर असताना मानसिक एकाग्रता सुधारण्यासाठी आणि जीवनात सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी विविध योग तंत्र शिकण्याकरता आणि त्याचा अवलंबण्यास योगाभ्यासामुळे प्रोत्साहन मिळते . विविध खेळ आणि स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांनी त्यांच्या अभ्यासक्रमात योगाचा औपचारिक समावेश केल्यानंतर चांगली कामगिरी केली आहे. सैनिकांची कुटुंबे आणि संबंधितांनाही त्यांच्या दैनंदिन जीवनात योगाचा सराव आणि अवलंब करण्यास सक्रियपणे प्रोत्साहन दिले जाते. योग हा आपल्या सैनिकांच्या दिनक्रमाचा  एक भाग बनत आहे आणि त्यांना त्याचा खूप फायदा होत आहे.


R.Aghor/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1835975) Visitor Counter : 165


Read this release in: English