पर्यटन मंत्रालय
से कॅथेड्रल ओल्ड' या गोव्याच्या प्रसिद्ध मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
कोविड-19 दरम्यान, भारत हे उपचारांचे केंद्र म्हणून उदयाला आले आणि जगाला योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले - केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
Posted On:
21 JUN 2022 4:03PM by PIB Mumbai
गोवा , 21 जून 2022
आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सेंट फ्रान्सिस झेवियर, से कॅथेड्रल ओल्ड गोवा (गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट) च्या प्रसिद्ध लार्गो येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात समाजाच्या सर्व स्तरातील 800 हून अधिक जण सहभागी झाले होते.



भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणाऱ्या ‘स्वातंत्र्याचया अमृत महोत्सव’ कार्यक्रमाशी योगायोग साधणाऱ्या योगदिनानिमित्त योगाच्या सामूहिक प्रात्यक्षिकाचे उद्घाटन केंद्रीय पर्यटन, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी बोलताना नाईक म्हणाले की, केंद्र सरकार दरवर्षी जगभरात मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करते. भारताचे वैभवशाली सौंदर्य, विविध स्थळे , भौगोलिक आणि वास्तुकलेचे दर्शन घडवण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर अतुल्य भारताचा प्रसार करण्यासाठी, केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 साजरा करण्यासाठी देशभरातील 75 प्रतिष्ठित पर्यटन स्थळे निवडली आहेत.



गोव्यातली दोन प्रसिद्ध ठिकाणे केंद्र सरकारने निवडली आहेत हे सांगून त्यांनी आनंद व्यक्त केला. दुसरे ठिकाण अग्वाडा किल्ला आणि तुरुंग संग्रहालय संकुल आहे. नाईक यांनी यंदाच्या योगदिनाची संकल्पना स्पष्ट केली - या वर्षाची संकल्पना ‘मानवतेसाठी योगसाधना ’अशी आहे. योगाचे महत्व लक्षात घेता ही संकल्पना योग्य आहे, योगामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते, कोविड रूग्णांना तणावमुक्त होण्यास आणि लवकर बरे होण्यात उपयुक्त ठरते असे ते म्हणाले.


तणावरहित शांतता अनुभवत, आपल्या शंकांवर मात करून, जीवनाचा उद्देश शोधून, योगींनी जीवनातील या सर्वात मूलभूत समस्यांवर दीर्घकाळ चिंतन केले आणि या समस्यांवर उपाय शोधले. योगसाधना सुंदर जीवन जगण्याचा पर्याय देते. विज्ञान आणि जीवन जगण्याची कला म्हणजेच योगाद्वारे आपण हेच शिकतो. योगाच्या बहुआयामी बाबी स्पष्ट करताना केवळ भारतातच नव्हे तर जगभरात योगाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भारतीय योग गुरूंचे त्यांनी आभार मानले.
औपचारिक उद्घाटन समारंभानंतर गोवा राज्य योग अकादमीच्या समन्वयाने योग प्रात्यक्षिक करण्यात आले. प्रात्यक्षिकांमध्ये सामान्य योग प्रोटोकॉलनुसार आसने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा समावेश होता. त्यानंतर गोवा राज्य योग अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.

पर्यटन मंत्रालयाने आज म्हणजेच,21 जून रोजी देशभरातील आपल्या भारत पर्यटन कार्यालयांद्वारे देशातील 75 प्रमुख पर्यटन स्थळे आणि प्रतिष्ठित ठिकाणी योग सत्र आणि थेट प्रात्यक्षिकांचे आयोजन केले आहे.
R.Aghor/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1835916)
Visitor Counter : 158