ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानके संस्थेच्या मुंबई पथकाने ठाण्यात मानकांच्या चिह्नाचा गैरवापर करणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद बाटल्या केल्या जप्त
आयएसआय चिह्नाचा गैरवापर बीआयएस ला कळवा
Posted On:
18 JUN 2022 11:22AM by PIB Mumbai
बीआयएस अर्थात भारतीय मानके संस्थेने ठाण्यातील भिवंडी येथून पिण्याच्या पाण्याच्या 4900 सीलबंद बाटल्या जप्त केल्या. या बाटल्यांवर बीआयएसच्या मानक चिह्नाचा बेकायदेशीर वापर केलेला होता. IS 14543:2016 नुसार, ठाण्यात भिवंडी येथे पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद बाटल्यांवर बीआयएसच्या प्रमाणनाचे चिह्न बेकायदेशीर पद्धतीने वापरले जात आहे का, याचा तपास करण्यासाठी बीआयएसच्या मुंबई पथकाने 17.06.2022 रोजी, भिवंडीत सक्तीचा तपास आणि जप्तीची धाड टाकली.
मेसर्स बालाजी एन्टरप्रायझेस, H.No- 611, वेहेळे, पो.- पिंपळास, माणकोली मार्ग, ता.भिवंडी, जि.ठाणे 421311 Mumbai - 400705 येथे, बीआयएसकडून वैध परवाना ना घेताच बीआयएस प्रमाणन चिह्नाचा बेकायदेशीर वापर करून, बीआयएस कायदा, 2016 च्या कलम 17 चे उल्लंघन केले जात असल्याचे या धाडीच्या वेळी निदर्शनास आले.
या जप्तीच्या कारवाईच्या वेळी पिण्याच्या पाण्याच्या 500 मिलीच्या अंदाजे 4900 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या सीलबंद बाटल्यांवर बीआयएस प्रमाणन चिह्न अंकित केलेले होते, मात्र ते या कंपनीचे नव्हते, असे आढळून आले. सदर अपराधाबद्दल न्यायालयात खटला भरण्यासाठी पुढील कारवाई करण्यात येत आहे.
ही तपास आणि जप्ती कारवाई बीआयएसच्या अधिकाऱ्यांनी- 'शास्त्रज्ञ-सी तथा उपसंचालक टी अर्जुन आणि शास्त्रज्ञ-बी तथा सहसंचालक विवेक रेड्डी यांनी केली.
कोणत्याही उत्पादनावरील आयएसआय चिह्नाचा गैरवापर कळवा-:
बीआयएस प्रमाणन चिह्नाचा गैरवापर हा 'बीआयएस कायदा, 2016' अन्वये दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा किमान 2,00,000 रुपयांचा दण्ड किंवा दोन्ही अशा स्वरूपाच्या शिक्षेस पात्र आहे. अनेकदा असे निदर्शनास आले आहे की, मोठ्या प्रमाणात नफा कमावण्यासाठी आयएसआयच्या बनावट चिह्नाचा वापर करून उत्पादने तयार केली जातात आणि ग्राहकांना विकली जातात. यास्तव, खरेदीपूर्वी त्या वस्तूवरीलआयएसआय चिह्नाची सत्यता पडताळून पाहण्याची विनंती सर्वांना करण्यात येत आहे. यासाठी बीआयएसच्या पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी- http://www.bis.gov.in .
एखाद्या उत्पादनावर आयएसआय चिह्नाचा गैरवापर/बेकायदेशीर वापर होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी ती गोष्ट- 'प्रमुख, MUBO-II, पश्चिम प्रादेशिक कार्यालय, बीआयएस, दुसरा मजला, NTH (WR), भूखंड क्र. F-10, एमआयडीसी, अंधेरी, मुंबई-400093' - येथे कळवावी. तसेच hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर इ-मेल करूनही अशा तक्रारी करता येतील. या माहितीचा स्रोत/ माहिती पुरवणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
***
ST/JV/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1835034)
Visitor Counter : 198