आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

राज्ये/केंद्रशासित प्रदेशेंतील कोविड-19 प्रतिबंधक लस उपलब्धतेबाबत अद्ययावत माहिती


राज्ये केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 193.53 कोटींहून अधिक मात्रांचा पुरवठा

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप न वापरलेल्या 13.12 कोटींपेक्षा अधिक मात्रा शिल्लक आणि लसीकरणासाठी उपलब्ध

Posted On: 17 JUN 2022 9:34AM by PIB Mumbai

देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सुरूवात 16 जानेवारी 2021 रोजी झाली. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरू झाला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टिने लसींची अधिक उपलब्धता, लसींच्या साठ्याविषयी आगाऊ सूचना आणि लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करणे या माध्यमातून लसीकरण मोहिमेची गती वाढवण्यात आली आहे.

 

देशव्यापी लसीकरणाचा एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसींचा विनामूल्य पुरवठा करत त्यांना सहाय्य करत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सार्वर्त्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात, केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे 75  टक्के लस खरेदी करून या लसींचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य) पुरवठा करत आहे.

 

VACCINE DOSES

 

(As on 17th June 2022)

 

SUPPLIED

 

1,93,53,58,865

 

BALANCE AVAILABLE

 

 

13,12,10,500

 

भारत सरकारकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 193.53 कोटीहून अधिक मात्राचा  (1,93,53,58,865) (विनामूल्य) आणि थेट राज्य खरेदी श्रेणीद्वारे पुरवठा केला आहे. कोविड प्रतिबंधक लसींच्या 13.12  कोटी (13,12,10,500) न वापरलेल्या मात्रा अद्यापही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.

***

STupe/UKulkarni/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1834727) Visitor Counter : 149