अर्थ मंत्रालय
पुणे सीमाशुल्क आयुक्तालय आणि महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे प्रादेशिक युनिट यांच्याकडून जप्त केलेले 2439 किलो अंमली पदार्थ नष्ट
Posted On:
08 JUN 2022 7:40PM by PIB Mumbai
पुणे , दि. 9 जून 2022
सध्या सुरू असलेल्या आझादी का अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने, महसूल गुप्तचर संचालनालयासह केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या कार्यालयांनी 42054 किलो पेक्षा जास्त अंमली पदार्थ, 1710845 गोळ्या, 72757 कफ सिरपच्या बाटल्या आणि 16336 इंजेक्शनच्या कुपी नष्ट केल्या. अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि तस्करी विरुद्ध एक मजबूत संदेश देण्यासाठी 8 जून 2022 रोजी समन्वयित पद्धतीने या अमली पदार्थांची विल्हेवाट संपन्न केली. या कार्यक्रमाची अध्यक्षता माननीय केंद्रीय अर्थमंत्री, श्रीमती. निर्मला सीतारामन यांनी भुषावली तसेच देशभरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या दुरुपयोग आणि तस्करीविरूद्ध मजबूत संदेश देण्यासाठी आभासी पद्धतीने या समन्वयित कार्यवाहीमध्ये भाग घेतला.

याच कार्यवाहीचा एक भाग म्हणून, पुणे सीमाशुल्क आयुक्तालयाने पुणे सीमाशुल्क आयुक्तालय आणि महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे प्रादेशिक युनिट यांनी जप्त केलेल्या 2439 किलो ड्रग्जची पूर्व-चाचणी विल्हेवाट लावली. हा सर्व जप्त मुद्देमाल मेसर्स. महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, एमआयडीसी, रांजणगाव यांच्या परिसरात अत्याधुनिक प्लाझ्मा गॅसिफिकेशन आधारित भस्मीकरण सुविधेवर दि. ८ जून २२ रोजी नष्ट करण्यात आला. डॉ. मुक्ता पुणतांबेकर, संचालिका, मुक्तांगण पुनर्वसन केंद्र, पुणे आणि डॉ. सोनाली काळे, समन्वयक, मुक्तांगण पुनर्वसन केंद्र, पुणे यांनीही या कार्यवाहीला हजेरी लावली.

माननीय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अधिकार्यांचे अंमली पदार्थांच्या तस्करीशी लढा देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल कौतुक केले आणि मुक्तांगण पुनर्वसन केंद्रासारख्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली, जे तरुणांसोबत मोठ्या प्रमाणावर काम करतात, अंमली पदार्थांबद्दल जागरूकता निर्माण करतात आणि व्यसनाधीनांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.

****
MI/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832541)
Visitor Counter : 137