अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ‘आयकॉनिक सप्ताहा’अंतर्गत सीमाशुल्क विभागाकडून पाळण्यात आला "अंमली पदार्थ विध्वंस दिन"


मुंबई सीमाशुल्क विभागाने एमआयडीसी तळोजा इथे 225 कोटी रुपयांचे 2 टनांहून अधिक अंमली पदार्थ केले नष्ट

Posted On: 08 JUN 2022 7:32PM by PIB Mumbai

मुंबई, 8 जून 2022

 

स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त वित्त मंत्रालयाच्या आयकॉनिक सप्ताहाचा भाग म्हणून केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी)अंतर्गत भारतीय सीमाशुल्क विभागाकडून आज संपूर्ण भारतभर "अंमली पदार्थ विध्वंस दिवस ' पाळण्यात आला.

याचाच भाग म्हणून, मुंबईत, एमआयडीसी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडच्या जागेवर अंमली पदार्थ नष्ट करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या अभियानादरम्यान सुमारे 2,040 किलो अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे (सायकोट्रॉपिक)  पदार्थ नष्ट करण्यात आले.सीमाशुल्क विभागाचे मुख्य आयुक्त, मुंबई क्षेत्र III रूपम कपूर यांच्या देखरेखीखाली 1064 किलो मेथॅम्फेटामाइन, 238 किलो मेफेड्रोन, 483 किलो इफेड्रिन आणि 204 किलो मॅड्राक्स हे 225 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ नष्ट कर करण्यात आले.

   

केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन, महसूल सचिव  तरुण बजाज, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष विवेक जोहरी आणि वित्त मंत्रालयाच्या इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी गुवाहाटी, लखनौ, मुंबई अशा सहा ठिकाणी अंमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया आभासी माध्यमातून पाहिली.संपूर्ण भारतात 14 ठिकाणी राबवलेल्या या  विशेष अभियानाच्या माध्यमातून 42 टन अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ नष्ट करण्यात आले.

   

अंमली पदार्थ विरोधी अंमलबजावणी करणार्‍या संस्थांमध्ये, विशेषत:महसूल गुप्तचर संचालनालय आणि इतर कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांमधील चांगल्या समन्वयामुळे आणि माहिती विश्लेषणाच्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे, ही प्रकरणे शोधून काढण्यात आणि गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी विभाग सक्षम झाला आहे,असे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष विवेक जोहरी यांनी सांगितले.


* * *

PIB Mumbai | R.Aghor/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1832327) Visitor Counter : 126


Read this release in: English