संरक्षण मंत्रालय
हवाई दलाचे कमांडर विवेक सिंग बलोरिया यांनी कान्हेरीच्या टेकड्यांमध्ये असलेल्या हवाई दलाच्या तळाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2022 9:38PM by PIB Mumbai
मुंबई, 6 जून 2022
हवाई दल कमांडर विवेक सिंग बलोरिया यांनी आज 06 जून 2022 रोजी कान्हेरीच्या टेकड्यांमध्ये असलेल्या हवाई दलाच्या तळाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. हवाई दलाच्या तळावर झालेल्या लष्करी समारंभात त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. हवाई दलातील वायू सेना पदक विजेते कमांडर आर. संजीव कुमार यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे हाती घेतली.

हवाई दल कमांडर विवेक सिंग बलोरिया हे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडे दिशादर्शित शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने, इलेक्ट्रॉनिक लढाऊ शस्त्रे, हवाई दलात वापरण्यात येणारी शस्त्र सामग्री तसेच हवाई क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण यांसारख्या अनेक परिचालनाचा प्रचंड अनुभव आहे.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1831666)
आगंतुक पटल : 157
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English