पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 6 जून रोजी अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक सप्ताहाचे उद्घाटन करणार


पंतप्रधानांच्या हस्ते शासकीय योजनांसाठीच्या जन समर्थ पोर्टलचे उद्घाटन

Posted On: 05 JUN 2022 9:52AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जून, 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्ली मधील विज्ञान भवन येथे अर्थ मंत्रालय आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या आठवडाभराच्या भव्य सोहोळ्याचं उद्घाटन करतील. 6 ते 11 जून, 2022 हा आठवडा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा (AKAM) निमित्त आयोजित कार्यक्रमांचा भाग आहे. 

पंतप्रधान यावेळी ‘जन समर्थ पोर्टल’ या सरकारी योजनेच्या पोर्टलचं उद्घाटन करतील. या एकाच डिजिटल पोर्टलवर सरकारच्या सर्व अनुदान-आधारित योजना उपलब्ध होतील. लाभार्थ्यांना अनुदान- पुरवठादारांशी थेट जोडणारे हे अशा प्रकारचे हे पहिलेच व्यासपीठ आहे. विवध क्षेत्रांना मार्गदर्शना द्वारे सोप्या डिजिटल प्रक्रीयेच्या मदतीने योग्य प्रकारचे सरकारी फायदे उपलब्ध करून त्या क्षेत्रांच्या विकासाला प्रोत्साहन देणे हा जन समर्थ पोर्टलचा प्रमुख उद्देश आहे. या पोर्टलवर त्याच्याशी जोडलेल्या सर्व योजनांची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. 

या दोन्ही मंत्रालयांच्या गेल्या आठ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणाऱ्या डिजिटल प्रदर्शनाचे पंतप्रधान उद्घाटन करतील. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांच्या नाणी जारी करण्यात येतील. या वैशिष्ट्यपूर्ण नाण्यांवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (AKAM) या संकल्पनेचा लोगो असेल तसेच ही नाणी दृष्टीहीन व्यक्तींना देखील सहज ओळखता येतील. 

हा कार्यक्रम देशात 75 ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला जाणार असून प्रत्येक ठिकाण दृकश्राव्य माध्यमातून कार्यक्रमाच्या प्रमुख जागेशी जोडले जाणार आहे.  

****

S.Thakur/R. Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1831271) Visitor Counter : 232