संरक्षण मंत्रालय

आयएनएस निशंक आणि आयएनएस अक्षय ही नौदलाची जहाजे सेवानिवृत्त

Posted On: 04 JUN 2022 4:35PM by PIB Mumbai

मुंबई, 4 जून 2022

देशाची 32 वर्षे गौरवशाली सेवा केल्यानंतर निशंक आणि अक्षय ही  भारतीय नौदलाची जहाजे काल सेवानिवृत्त झाली. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे पारंपरिक समारंभात त्यांना निरोप देण्यात आला. राष्ट्रीय ध्वज, नौदलाचे चिन्ह आणि दोनही जहाजांचे पेनंट सूर्यास्ताच्या वेळी खाली करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे, नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार  यांनी मानवंदना स्वीकारली

आयएनएस निशंक आणि आयएनएस अक्षयच्या कमांडिंग अधिकाऱ्यांसमवेत मेळाव्याला संबोधित केले

आयएनएस निशंक 12 सप्टेंबर 1989 रोजी कार्यान्वित झाली होती तर त्यानंतर एका वर्षानंतर 10 डिसेंबर 1990 रोजी आयएनएस अक्षय पोटी, जॉर्जिया येथे नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. आयएनएस निशंक आणि आयएनएस अक्षय ही जहाजे महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंगच्या ऑपरेशनल नियंत्रणाखाली अनुक्रमे 22 मिसाईल व्हेसल स्क्वाड्रन आणि 23 पॅट्रोल व्हेसल स्क्वाड्रनचा भाग होते.

दोन जहाजांवरचे नौदलाचे चिन्ह आणि डिकमिशनिंग पेनंट सूर्यास्ताच्या वेळी शेवटच्या वेळी खाली करण्यात आले आणि जतन करण्यासाठी सुपूर्द केले

ही जहाजे 32 वर्षांहून अधिक काळ नौदल सेवेत सक्रिय होती आणि त्यांच्या गौरवशाली प्रवासादरम्यान कारगिल युद्धादरम्यान ओपरेशन तलवार आणि 2001 मध्ये ऑपरेशन पराक्रम यासह अनेक नौदल मोहिमांमध्ये त्यांनी भाग घेतला.

आयएनएस निशंकच्या माजी कमांडिंग अधिकाऱ्यांचा ग्रुप फोटो

आयएनएस अक्षयच्या माजी कमांडिंग अधिकाऱ्यांचा ग्रुप फोटो

नौदल प्रमुख डमिरल आर हरी कुमार हे या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे होते. व्हाईस डमिरल अजेंद्र बहादूर सिंग, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड आणि व्हाईस डमिरल बिस्वजित दासगुप्ता, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ ईस्टर्न नेव्हल कमांड या समारंभासाठी उपस्थित होते. आयएनएस अक्षय आणि आयएनएस निशंकचे पहिले कमांडिंग अधिकारी व्हाइस डमिरल आरके पटनायक (निवृत्त) आणि व्हाईस डमिरल एसपीएस चीमा (निवृत्त) या कार्यक्रमासाठी सन्माननीय पाहुणे होते.

आयएनएस निशंकची लहान प्रतिकृती अंतिम कमांडिंग ऑफिसर सीडीआर हिमांशू कपिल यांनी प्रथम कमांडिंग ऑफिसर व्हीएडीएम एसपीएस चीमा (सेवानिवृत्त) यांना नौदल प्रमुख डमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली

G.Chippalkatti/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

(Release ID: 1831119) Visitor Counter : 144

Read this release in: English