माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मुंबईत सुरु असलेल्या 17 व्या मिफ्फ च्या आजच्या सहाव्या दिवशी ‘एव्हरी लाईफ मॅटर्स', 'अप्पाज सीझन्स', 'स्वीट बिर्याणी', 'एक अच्छी नौकरी' या लघुपटांच्या टीमने मिफ्फ संवादमध्ये प्रसारमाध्यमांशी साधला संवाद
Posted On:
03 JUN 2022 9:09PM by PIB Mumbai
मुंबई, 3 जून 2022
अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने लघुपटांसाठी आजही पुरेसे मंच उपलब्ध नसून, कल्पनांचे आदानप्रदान, या क्षेत्रातील व्यक्तींसोबत समन्वय या दृष्टीने मिफ्फ हा अत्यंत महत्त्वाचा मंच असल्याचे मत एव्हरी लाईफ मॅटर्स', 'अप्पाज सीझन्स', 'स्वीट बिर्याणी','एक अच्छी नौकरी' या लघुपटांच्या दिगदर्शकांनी व्यक्त केले. मुंबईत सुरु असलेल्या 17 व्या मिफ्फ च्या आजच्या सहाव्या दिवशी ‘' या लघुपटांच्या दिग्दर्शकांनी मिफ्फ संवादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
''स्वीट बिर्याणी'' हा लघुपट आम्ही स्वतःच्या समाधानासाठी केला. आमच्याप्रमाणेच तो लोकांनाही भावत असल्याचे पाहून आनंद होत असल्याची भावना लघुपटाचे दिग्दर्शक जयचंद्र हश्मी, सिनेमॅटोग्राफर प्रवीण बालू आणि संकलक गौतम जी. ए यांनी व्यक्त केली. एका तामिळ लेखावरून या लघुपटाची कल्पना सुचल्याचे दिग्दर्शक जयचंद्र हश्मी यांनी सांगितले.
स्वीट बिर्याणी (28 मि.)
दिग्दर्शक - जयचंद्र हश्मी
कलाकार- सारिथिरन
संगीत -अरुल देव
सिनेमॅटोग्राफी -प्रवीण बालू
संकलक -गौतम जी. ए
कथासार :
मारीमुत्तू या खाद्यपदार्थ पोहोचवण्याऱ्या डिलिव्हरी बॉयच्या दिवसभराच्या अनुभवावर हा चित्रपट आहे.
अ गुड जॉब (एक अच्छी नौकरी) भारत 2021 | हिंदी 22.25 मिनिटे
कलाकार- मीता भारद्वाज : पुलकित माकोल, रोशनी सहोटा ,श्रेष्ठा बॅनर्जी : राकेश सिंग: सूरज कुमार: किंगशुक मोरान
दिग्दर्शक :- अनुज भारद्वाज
ध्वनी : अनुज भ रद्वाज
''कथानकात सांगितलेली नोकरी प्रचंड पैसा देणारी आहे. लघुपटातील नायकाला त्याची नोकरी आवडत असते. पण समाज काय म्हणेल याची काळजी आपल्याला नेहमी असते. चित्रपटाच्या कथानकाचा विषय लोकांपर्यंत पोहोचवतानाच त्याची मांडणी हलकीफुलकी व्हावी, अशी इच्छा होती. त्या दृष्टीने हा चित्रपट आव्हानात्मक होता,असे दिग्दर्शक अनुज भारद्वाज यांनी सांगितले.
कथासार :
चांगल्या नोकरीची व्याख्या नेहमीच वादातीत असते. एखादी नोकरी तुम्ही समाजाला, तुमच्या पालकांना आणि तुमच्या कुटुंबाला खूश करण्यासाठी करता की तुम्हाला करायला आवडते म्हणून करता ?यावर विचार करायला लावणारी ही एक वेगळी प्रेमकथा आहे. लग्न जुळवण्याचा दरम्यान निधी आणि प्रशांतची भेट होते. आपल्या भावी पतीने काय केले पाहिजे याबद्दल स्वतःचे मत असलेल्या निधीला वाटते की तिला तिचा जोडीदार सापडला आहे; पण खरोखरच तसे आहे का ? यासाठी हा लघुपट अवश्य पाहा.
एव्हरी लाइफ मॅटर्स-भारत - 2021 हिंदी (15.03 मि.)
दिग्दर्शक -दधी आर पांडे
निर्माता -गिरीश अरोरा, संगीता गिरीश अरोरा
कलाकार- सत्यजीत शर्मा, सुदीप सारंगी, अतुल तिवारी
''या चित्रपटाचे कथानक मला स्वतःला भावले. मी एक व्यावसायिक असल्याने लॉकडाऊनमधल्या आव्हानांना स्वतः सामोरे जात होतो''असे निर्माता गिरीश अरोरा यांनी सांगितले. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना लॉकडाऊन, लोकांचे स्थलांतर, नोकऱ्या जाणे,अशी स्थिती आजूबाजूला होती. चित्रीकरणातही आव्हाने होती, असे दिग्दर्शक दधी आर. पांडे यांनी यावेळी सांगितले. एखादी कथा लघुपटाच्या माध्यमातून १०-१५ मिनिटात दाखवणेही शक्य आहे. इतर देशात ज्याप्रमाणे लघुपटाला महत्त्व आहे, तसे आपल्या देशातही मिळायला हवे,असे मत अभिनेता सुदीप सारंगी यांनी यावेळी व्यक्त केले.
कथासार :
एक स्वार्थी व्यापाऱ्याने, महामारीच्या काळात संपूर्णपणे नफा कमावण्यावर लक्ष केंद्रित केले असते. एक दिवस त्याच्या घरात अचानक एक आगंतुक येतो. त्याच्या सोबतच्या संभाषणातून त्याचे मनःपरिवर्तन घडते. आपल्या भूतकाळातील चुका सुधारण्याची इच्छा त्याला होते.
अप्पाज सीझन्स, भारत 2020 | तमिळ] 22.07 मि
दिग्दर्शक- राधिका प्रसिद्ध
निर्माता-डॉ. के. जया रमेश
सिनेमॅटोग्राफर:देवराज पुगझेंठी लावण्य रमाया
भावनांबद्दल आपल्याकडे पुरेशा गांभीर्याने चर्चा केली जात नाही. विकसनशील देशात मानसिक आघात कसे हाताळले जातात.. व्यसनी पालकांचा मुलांवर होणारा परिणाम यावर फारसे संशोधन झालेले नाही, असे मत या लघुपटाच्या दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि सायकोथेरपिस्ट राधिका प्रसिद्ध यांनी यावेळी सांगितले. भावना खूप गुंतागुंतीच्या असतात. अभिनय आणि दिग्दर्शन एकाच वेळी सांभाळणे आव्हानात्मक असल्याची जाणीव या लघुपटाने करून दिली, असे त्यांनी नमूद केले.
कथासार :
25 वर्षीय मनो तिच्या वृद्ध वडिलांना सांभाळत दिवस घालवत असते. लघुपटात तिच्या आठवणींची एक दुपार दर्शविली आहे. आठवणी काही त्रासदायक, काही प्रेमळ, काही हिंसक आणि काही कोमल. मनोच्या मनात2 तिच्या मद्यपी वडिलांसोबतच्या बालपणाची आठवणी जागत असतात जो जे आता भूतकाळ आहे. एखादी व्यक्ती हरवलेल्या बालपणाबद्दल दुःखी होऊ शकते का? भूतकाळ मागे सारणे शक्य आहे का, विशेषतः जेव्हा आठवणी खूप गुंतागुंतीच्या असताना!.बालपणीच्या प्रेमाची कसर भरून निघते का? त्या वेदनांपासून मुक्ती शक्य आहे का ...मनो शोध घेते आणि स्वप्न पाहते.
* * *
PIB MIFF Team | R.Aghor/S.Kakade/Darshana/MIFF-59
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830973)
Visitor Counter : 203