माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'मेन विल बी मेन', 'इन टू द सी' आणि 'टुगेदर' या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मिफ्फ संवादमध्ये माध्यम प्रतिनिधींशी साधला संवाद


‘इन टू द सी’ चित्रपटाचे वादळात चित्रीकरण करणे अतिशय कठीण अनुभव- दिग्दर्शक आशिष नायक

Posted On: 03 JUN 2022 4:47PM by PIB Mumbai

मुंबई, 3 जून 2022
 


सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - मिफ्फ मध्ये 'मेन विल बी मेन', 'इन टू  द सी' आणि 'टुगेदर' या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आज पत्रकार परिषदेत आपल्या चित्रपटांचा प्रवास उलगडून सांगितला.

'मेन विल बी मेन' हा पति-पत्नी संबंधांवर आधारित सिनेमा आहे. कितीही अडचणी असो, हसत रहा असा संदेश यातून दिल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक कुमार चंद्र सेखराम म्हणाले. गेल्या लॉकडाऊनमध्ये लोणावळा-मुंबई प्रवासात याचे चित्रीकरण केले आहे. चित्रपटाचा नायक आणि गाडीचा ड्रायव्हर या दोघांचा एकाच दिवशी लग्नाचा वाढदिवस असतो. प्रवासादरम्यान दोघांच्या पत्नीचा फोन येतो,  ड्रायव्हर पत्नीशी खरे बोलतो तर नायक खोटे बोलतो. यातून पुढे घडलेल्या घटना पडद्यावर पाहणे रंजक ठरेल.

‘इन टू  द सी’ उडिया भाषेतील सिनेमा आहे. समुद्रात चक्रीवादळ केव्हाही धडकते. किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसून मोठ्या प्रमाणावर हानी होते. देशाच्या इतर भागातील लोकांना त्याची कल्पना नसते. असे इन टू  द सी चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष नायक म्हणाले. वादळी वाऱ्यातही समुद्रात जाऊन मासेमारी करणाऱ्यांचे भावविश्व यात दाखवले आहे. वादळात चित्रीकरण करणे अतिशय कठीण होते. समुद्रातून बाहेर आल्यावरही आम्ही हेलकावे खात होतो असे ते म्हणाले.

‘टुगेदर’ हा 22 मिनिटांचा लघुपट आहे. कोविड  महामारीच्या दुसऱ्या लाटेची याला पार्श्वभूमी आहे. कोविड काळातील भावनिक चढउतार यात दाखवण्यात आल्याचे दिग्दर्शक आझाद आलम म्हणाले. दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (न्यूयॉर्क) आणि न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये याचा प्रीमियर झाला आहे.

* * *

PIB MIFF Team | S.Patil/S.Kane/Darshana/MIFF-56

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1830827) Visitor Counter : 266


Read this release in: English