युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
जागतिक सायकल दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी सायकल रॅलींचे आयोजन
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचे उद्घाटन; उत्साही सायकलस्वारांसोबत मंत्रीमहोदयांनीही चालवली सायकल
Posted On:
03 JUN 2022 3:46PM by PIB Mumbai
मुंबई, 3 जून 2022
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी जागतिक सायकल दिनानिमित्त नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियम येथून राष्ट्रव्यापी कार्यक्रमास हिरवा झेंडा दाखवला. दिल्लीतील 7.5 किलोमीटरच्या या रॅलीमध्ये 1500 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला.

जागतिक सायकल दिन साजरा करण्यासाठी, नेहरू युवा केंद्र संघटनेने 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी सायकल रॅलींचे आयोजन केले होते. ज्यात 75 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या आणि प्रतिष्ठित स्थळांचाही समावेश होता.
मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँपसमध्ये एक सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पुण्यात, ऐतिहासिक आगाखान पॅलेसपासून सायकल रॅली सुरू झाली आणि डेक्कन महाविद्यालयात समाप्त झाली. आणखी एका सायकल रॅलीला नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.


सायकल रॅली आयोजन करण्याचा उद्देष्य लोकांनी शारिरीक तंदुरूस्तीसाठी तसेच लठ्ठपणा, आळशीपणा, तणाव, चिंता, आजार यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांच्या रोजच्या जीवनात सायकल चालवण्याचा पर्याय स्वीकारावा, यासाठी प्रोत्साहित आणि प्रेरित करणे हा होता. सायकल चालवण्याचा पर्याय स्वीकारून, सामान्य नागरिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यासही मदत करू शकतात. युवा स्वयंसेवकांना आझादी का अमृत महोत्सवाच्या बरोबरच आपापल्या गावांमध्ये अशा सायकल रॅलीमध्ये सहभाग घेण्यास तसेच त्यांचे आयोजन करण्यासही प्रेरित केले जात आहे.
जागतिक सायकल दिन साजरा करण्यामागे प्रमुख उद्दिष्ट सर्वसाधारणपणे लोकांमध्ये आणि युवकांमध्ये शारिरीक तंदुरूस्तीबाबत जागृती तयार करण्याचे आहे. 'फिटनेस का डोस आधा घंटा रोज' या अंतर्गत नागरिकांना दररोज किमान 30 मिनिटे शारिरीक तंदुरूस्तीच्या व्यायामाचा समावेश करावा, यासाठी प्रेरित केले जात आहे.
G.Chippalkatti/U.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830820)
Visitor Counter : 91