युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
जागतिक सायकल दिनानिमित्त गोवा नेहरु युवा केंद्राकडून सायकल रॅलीचे आयोजन
Posted On:
03 JUN 2022 3:31PM by PIB Mumbai
गोवा, 3 जून 2022
नेहरु युवा केंद्र, गोवा यांच्याकडून आज जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मत्स्यउद्योग मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारीत पेड्डे क्रीडा संकुल ते कोलवाळ असे 7.5 किमी अंतर सायकलस्वारांनी पार केले.

पर्यावरण संवर्धन, प्रदूषणापासून सुटका यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर वाढवावा, असे मंत्री निळकंठ हळर्णकर याप्रसंगी म्हणाले.

नेहरु युवा केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या सायकलस्वारांना सायकल फेरीनंतर नेहरु युवा केंद्राकडून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्राने, या देशव्यापी कार्यक्रमातसर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून देशभरातील 75 प्रसिद्ध ठिकाणी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी दररोज किमान अर्धा तास शारिरीक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे, हा संदेश यातून देण्यात आला.
SRT/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830796)
Visitor Counter : 149