माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समाविष्ट ‘क्लोज्ड टू द लाईट’ “बॅकस्टेज’, आणि ‘छाया’ या चित्रपटांच्या दिग्दर्शकांचा ‘मिफ्फ संवाद’ मध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2022 6:49PM by PIB Mumbai
मुंबई, 1 जून 2022
मुंबईत सुरु असलेल्या सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आजच्या चौथ्या दिवशी, “बॅकस्टेज’ ह्या महितीपटाच्या दिग्दर्शिका लिपिका दराई, ‘क्लोज्ड टू द लाईट’ चे निर्माते दिग्दर्शक, निकोला पायव्हेसन आणि ‘छाया’ या लघुपटाचे दिग्दर्शक उत्सव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

‘क्लोज्ड टू द लाईट’ हा इटलीतील लघुपट, 1944 मधला, म्हणजेच दुसऱ्या महायुद्ध काळ जिवंत करणारा चित्रपट आहे. याच काळात इटलीत मुसोलिनीच्या सैन्याकडून सर्वसामान्य निरपराध लोकांवर, शेतकऱ्यांवर होणारे अत्याचार, त्यांच्या हत्या, याचं चित्रण या चित्रपटात आहे. या काळात इटलीत झालेलं संपूर्ण यादवी युद्ध हा चित्रपट जिवंत करतो. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, यातली सगळी पात्रे ‘फ्रीज’ म्हणजे स्थिर आहेत, आणि केवळ कॅमेरा फिरतो आहे. त्या काळात झालेले अत्याचार आणि त्यामुळे स्तब्ध झालेली मानवता, प्रत्ययकारी स्वरुपात सादर करण्यासाठी ह्या अभिनव तंत्राचा वापर केला, असे दिग्दर्शक निकोला पायव्हेसन यांनी सांगितले.

हा एका विशिष्ट काळातला लघुपट असल्याने, त्या काळातली वाहने, त्या काळातील वेशभूषा यांची व्यवस्था करणे हे सर्वात आव्हानात्मक आणि खर्चीक ठरले, असेही ते म्हणाले. मात्र लोकांकडून, मित्रांकडून वस्तू, निधी जमवून आपण हा लघुपट पूर्ण केला असे निकोला पायव्हसेन म्हणाले.

‘बॅकस्टेज’ हा लिपिका सिंग दराई यांचा ऊडिया भाषेतील माहितीपट, ओडिशामधील अस्तंगत होत चाललेल्या कठपुतळी कला आणि कलाकारांविषयी माहिती देतो. ओडिशामधील एक छोट्या गावातील कित्येक पिढ्या ही कला जागवत होत्या. मात्र आज त्यांची ही कदाचित अखेरची पिढी असेल, त्यामुळे त्यांची कथा सांगणे, त्यांची कला कॅमेऱ्यात बंद करणे, तिचे दस्तावेजीकरण करणे मला एक उडिया माहितीपट निर्माती म्हणून अतिशय आवश्यक वाटले, असे लिपिका सिंग यांनी सांगितले.

भाषिक चित्रपटांविषयी बोलतांना त्या म्हणाल्या की, प्रेक्षकांच्या मनात अनेक वर्षांपासून प्रादेशिक सिनेमा आणि हिन्दी सिनेमा अशी विभागणी आहे. मात्र आमच्यासाठी प्रादेशिक सिनेमा वेगळा नाही. तुम्ही ज्या भाषेत, तुमचे म्हणणे मांडू शकाल, त्या भाषेत अभिव्यक्त व्हायला हवे, असे माझे मत आहे. त्यामुळे मी ऊडिया भाषेत चित्रपट तयार करते, असे लिपिका यांनी सांगितले.

हरियाणाचे युवा दिग्दर्शक, उत्सव यांचा, ‘छाया’ हा लघुपट 1980 च्या काळातील, भारतातली एक काल्पनिक कथा सादर करतो. हा सिनेमा ‘मातृत्व’ ह्या शब्दाभोवती फिरतो. दुसरे लग्न केलेल्या एका व्यक्तीसमोर आपली दुसरी पत्नी आणि मुलांमधील एकाची निवड करण्याची वेळ येते, अशावेळी त्याने घेतलेला निर्णय त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा असतो. असे उत्सव यांनी सांगितले. यात मातृत्वाची वेगळी बाजू मांडली आहे, जि थेट नकारात्मक म्हणता येणार नाही, मात्र, आपल्या मातृत्वाच्या पारंपरिक कल्पनांना धक्का देणारी आहे. यात छाया म्हणजे भूत अशा प्रतीकाचाही वापर केला आहे. त्यामुळे, लोकांना या कथेवर विश्वास ठेवायला तयार करणे, हेच माझ्यासमोरचे आव्हान होते. असे उत्सव यांनी यावेळी सांगितले.
* * *
PIB MIFF Team | R.Aghor/Darshana/MIFF-40
|
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1830190)
आगंतुक पटल : 209
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English