माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘मायटी लिटल भीम: आय लव्ह ताज महाल’; भारतातल्या पहिल्या नेटफ्लिक्स मूळ अॅनिमेशन मालिकेचा ‘मिफ’मध्ये जागतिक प्रीमियर


भारताबाहेर 21 दशलक्षाहून अधिक घरांमध्ये ही मालिका पाहिली: कृष्ण मोहन चिंतपटला

अनोख्या पद्धतीने सादर केलेली उत्तम कथा नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करते: तीर्थदीप घोष

Posted On: 30 MAY 2022 9:29PM by PIB Mumbai

मुंबई, 30 मे 2022

 

‘मायटी लिटल भीम: आय लव्ह ताज महाल’ या भारतातल्या पहिल्या नेटफ्लिक्स मूळ अॅनिमेशन मालिकेने सर्व विक्रम तोडून जगभरात ठसा उमटवला आहे. भारताबाहेर 27 दशलक्षाहून अधिक घरांमध्‍ये  ही मालिका पाहिली गेली, असे चित्रपटाच्या’ क्रिएटिव्ह’  दिग्दर्शकांनी  आज 17व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (एमआयएफएफ- मिफ) या मालिकेच्या  जागतिक प्रीमियरमध्ये सांगितले. ते म्हणाले, अधिकृत नेटफ्लिक्स किड्स आणि फॅमिली यू ट्यूब वाहिनीवर हा सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ आहे.

मालिकेच्या स्क्रिनिंगच्यावेळी  ‘अ‍ॅनिमेशन इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या विषयावरील मास्टरक्लासला मार्गदर्शन  करताना  चिंतपटला म्हणाले, “भारताला एक महान संस्कृती आणि वारसा आहे. या अॅनिमेशन मालिकेत आम्ही प्रसिद्ध ताजमहाल आणि इतर अनोख्या पैलूंचा वापर केला आहे,  त्यामधून  आमच्या संस्कृतीची आणि सामग्रीची समृद्धता दर्शवते. अॅनिमेटिंगसाठी जगाच्या दृष्‍टीने भारत एक 'परिपूर्ण भूमी' असल्याचे हा चित्रपट स्वतःच दर्शवतो.”

“अनोख्या पद्धतीने सादर केलेली चांगली कथा नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करते. हा चित्रपट मुख्यत्वेकरून लहान मुलांसाठी असल्यामुळे, टीमने त्यांची मानसिकता आणि वर्तनशैलीशी संबंधित अनेक पैलूंचा विचार करून,  संवेदनशीलतेने चित्रपट बनवला आहे,” असे चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझायनर तीर्थदीप घोष यांनी यावेळी सांगितले. 

हैदराबाद येथील  अॅनिमेशन कंपनी- ग्रीन गोल्ड अॅनिमेशन प्रायव्हेट लिमिटेड द्वारे हा मास्टर क्लास घेण्यात आला. मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आणि प्रशंसनीय ठरलेल्या अॅनिमेटेड मालिकेच्या निर्मिती प्रक्रियेचा विस्ताराने आढावा यावेळी घेण्‍यात आला. 

‘मायटी लिटल भीम: आय लव्ह ताज महाल’:- जे पहिल्यांदाच प्रत्यक्ष आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने महोत्सवात सहभागी झाले आहेत, त्यांना भारतातील पहिली नेटफ्लिक्स मूळ अॅनिमेशन मालिका आज मुलांसाठी मोफत दाखवण्यात आली.  


* * *

PIB MIFF Team | R.Aghor/S.Bedekar/Darshana/MIFF-24

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवातचित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील.  ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk   या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1829603) Visitor Counter : 185


Read this release in: English