महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जारी केले


कोरोना महामारीत अनाथ झालेल्या बालकांना महाराष्ट्रात पाच ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांकडून प्रमाणपत्रांचे वितरण

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांचा या कार्यक्रमात मुंबईहून सहभाग

Posted On: 30 MAY 2022 6:17PM by PIB Mumbai

 मुंबई, 30 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लाभ जारी करण्यात आले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मंत्रिमंडळाचे इतर अनेक सदस्य, मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुलांसाठी गेल्यावर्षी सुरू केलेल्या पी एम केअर्स योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी संवाद साधला.

महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनी कार्यक्रमाना उपस्थित राहून  बालकांना पीएम केअर्स योजनेसंदर्भातील लाभांचे केले वितरण.

विविध केंद्रीय मंत्री महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणांहून या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले आणि त्यांनी कोविड-19 महामारीमुळे 11 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यान आपले पालक गमावलेल्या अनाथ लाभार्थी बालकांना योजनेची कागदपत्रे  असलेल्या फोल्डर्सचे वितरण केले.

मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालयात  झालेल्या  कार्यक्रमात  केंद्रीय माहिती आणि प्रसारण  राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी 18 मुलांना त्यांच्या पीएमकेयर्स साठीची पासबुके, पीएम-जेएवाय आरोग्य कार्ड, शिष्यवृत्ती यांच्यासह योजनेशी संबंधित कागदपत्रे आणि या मुलांना उद्देशून पंतप्रधानांनी लिहिलेले पत्र यांचा समावेश असलेली किट्स केली.

कोरोनाचा फटका बसलेल्या या मुलांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा पीएमकेयर्स हा छोटा प्रयत्न आहे असे मुरुगन म्हणाले.पंतप्रधान मोदी यांनी अनाथ मुलांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या कुटुंबातील सदस्यासारखा आधार देण्याची ग्वाही दिली असून या मुलांना आयुष्यात पुढे जाण्याचे आवाहन केले आहे असे मुरुगन यांनी यावेळी सांगितले.

नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलामुलींना पीएम केअर्स योजने अंतर्गत प्रमाणपत्र देण्यात आले. या मुलांनी  या योजनांचा लाभ घेत स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी केले.

रत्नागिरी येथील कार्यक्रमात  केंद्रीय रेल्वे आणि कोळसा  राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे,

रायगड येथून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील ,केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे चंद्रपूरहून कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या पाल्यांना मदतीचा हात देण्याच्या केंद्र सरकारच्या विशेष कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

पंतप्रधानांकडून मुलांप्रती सहानुभूती व्यक्त

कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या मुलांना आयुष्यात भेडसावत असलेल्या अडचणींबद्दल पंतप्रधानांनी यावेळी सहानुभूती व्यक्त केली. “दररोज नवा संघर्ष, दररोज नवी आव्हाने, आज ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होत आहे, त्या आपल्यासोबत असलेल्या मुलांचे दुःख शब्दात मांडणे खूप कठीण आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. मी पंतप्रधान म्हणून नव्हे तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून बोलत असल्याचे ते म्हणाले.

अशा परिस्थितीत, “आई आणि वडील दोघांचेही छत्र गमावलेल्या अशा कोरोनाग्रस्त मुलांच्या अडचणी कमी करण्यासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन हा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक देशवासीय अत्यंत संवेदनशीलतेसह तुमच्या पाठीशी आहे या वस्तुस्थितीचेही पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन हे एक प्रतिबिंब आहे " असे पंतप्रधान म्हणाले. र कुणाला व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज हवे असेल तर त्यासाठी देखील पीएम-केअर्स मदत करेल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

 

PIB Del/Mum/JPS/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1829516) Visitor Counter : 119


Read this release in: English