माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफ 2022 मध्ये ज्येष्ठ माहितीपट निर्माते आणि सुप्रसिद्ध सिनेलेखक संजित नार्वेकर यांना डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान


आयुष्यभर ज्यांच्या चित्रपटांचा अभ्यास आणि संधोशन केले, त्या डॉ. व्ही. शांताराम यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य: संजित नार्वेकर

Posted On: 29 MAY 2022 7:05PM by PIB Mumbai

मुंबई, 29 मे 2022


मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या १७ व्या पर्वात अर्थात मिफ २०२२च्या आज मुंबईत झालेल्या शुभारंभाच्या शानदार सोहळ्यात ज्येष्ठ माहितीपट निर्माते आणि सुप्रसिद्ध सिनेलेखक संजित नार्वेकर यांना यंदाच्या डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य, ग्राहक व्यवहार आणि अन्न तसेच सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते  संजित नार्वेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एम मुरुगन, केंद्रीय  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पंचायत राज राज्यमंत्री, कपिल मोरेश्वर पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड चित्रकर्मी शाजी करुण,  चित्रपट निर्माते किरण शांताराम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते

दहा लाख रुपये, चषक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माहितीपट क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सिनेसृष्टीतील नामवंत दिग्गजांना हा पुरस्कार दिला जातो.

आयुष्यभर ज्यांच्या चित्रपटांचा अभ्यास आणि संधोशन केला, त्या डॉ. व्ही. शांताराम यांच्या  नावाने असलेला पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य समजतो अशा शब्दात संजित नार्वेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी नार्वेकर  यांनी आपल्याला माहितीपट निर्मिती चळवळीकडे वळवणाऱ्या तसेच फिल्म्स डिव्हिजनमधल्या कर्मचाऱ्यांसह मदत करणाऱ्या इतर सगळ्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.

नार्वेकर यांनी चित्रपट क्षेत्रात विशेषत: चित्रपट इतिहास आणि माहितीपट चित्रपट चळवळीसाठी केलेल्या व्यापक, कक्षा रुंदावणाऱ्या आणि वैविध्यपूर्ण कामासाठी त्यांची यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड केली गेली आहे. एक अभ्यासपूर्ण चित्रपट इतिहासकार, चतूरस्त्र लेखक, एक कुशल संपादक / संकलक / एडीटर आणि चित्रपट निर्माते अशी अनेक बिरुदे धारण केलेल्या नार्वेकर यांनी, उत्तम सिनेमा निर्मिती आणि ललित कला, विशेषतः माहितीपट निर्मिती चळवळीच्या उत्थानासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. चित्रपटांचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यासाठी नार्वेकर यांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं. त्यांच्या या प्रवासानं अनेकांच्या हृदयाला, मनाला स्पर्ष केला, इतकंच नाही, तर काहीतरी उत्तम, महान आणि सुंदर काम करण्यासाठी अनेकांना प्रेरीत केलं आहे.

नार्वेंकर यांना १९९६ साली चित्रपटांवरील सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं गेलं होतं. चित्रपट जगताविषयीचं नार्वेकर यांचं अपार प्रेम आणि वेड त्यांच्या लिखाणात उतरल्याचं दिसतं. नार्वेकर यांनी आजवर, त्यांना सुवर्ण कमळ जिंकून देणाऱ्या 'मराठी सिनेमा इन रेट्रोस्पेक्ट' या पुस्तकासह चित्रपट क्षेत्रावारच्या २०हून अधिक पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलं आहे. फिल्म्स डिव्हीजनची निर्मिती असलेल्या, दिग्गज चित्रपट निर्माते डॉ. व्ही. शांताराम यांच्या आयुष्यावर आधारीत 'द पायोनिअरिंग स्पिरीट : डॉ. व्ही. शांताराम' या जीवनपटाचं दिग्दर्शनाचं श्रेय नार्वेकर यांचंच. यासोबतच नार्वेकर यांना विविध विषयांवरील अनेक माहितीपटांचं लेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे. याचबरोबरीनं चित्रपट क्षेत्रावरील लिखाणाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठीचे परीक्षक म्हणून आणि असंख्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे निवड समीतीचे सदस्य आणि परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहीलं आहे.

हा जीवनगौरवर पुरस्कार म्हणजे नार्वेकर यांचं वैचारीक नेतृत्व, या क्षेत्राला त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन, त्यांनी आयुष्यभर ललित कलेतील अमूल्य सौंदर्याचं घडवलेलं दर्शन, विविध गोष्टींकडे पाहण्याचा दिलेला नवा दृष्टीकोन, आणि त्या समजून घेत त्याचं प्रतिबिंब स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात उमटवण्याचा दिलेला विचार याचाच प्रामाणिकपणानं केलेला गौरव आहे. आणि म्हणूनच या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी नार्वेकर यांची निवड करतांना आपल्याला अत्यंत आनंद झाल्याचं या पुरस्कारासाठीच्या निवड समितीवरील  परीक्षकांनी म्हटलं आहे.

डॉ. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेचा डॉ. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार दरवर्षी  दिला जातो.सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक डॉ . व्ही शांताराम हे फिल्म डिव्हिजनशी दीर्घकाळ संबंधित होते आणि 1950 च्या दशकांत ते फिल्म्स डिव्हिजन या संस्थेचे मानद चित्रपट निर्माते राहिलेल्या  व्ही शांताराम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो.

दहा लाख रुपये, चषक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे  स्वरूप आहे. माहितीपट क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सिनेसृष्टीतील नामवंत दिग्गजांना हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत, एस. कृष्णमूर्ती, श्याम बेनेगल, नरेश बेदी, विजया मुळये यांसारख्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 


(संजित नार्वेकर यांच्याविषयीची अधिक माहिती खाली दिली आहे.)

 

#MIFF2022 DR. V. SHANTARAM LIFETIME ACHIEVEMENT AWARD

for

SANJIT NARWEKAR

JURY CITATION

 

Shri Sanjit Narwekar is being conferred with the Dr. V. Shantaram Lifetime Achievement Award, at the 17th edition of the Mumbai International Film Festival of India (MIFF 2022) for his exquisitely deep, remarkably broad, eclectically diverse and unfailingly inspiring body of work on the film sector, especially on film history and the documentary film movement. Donning multiple hats as an insightful film historian, a prolific author as well as a dextrous editor and filmmaker, Shri Narwekar has rendered a seminal contribution to the uplifting of good cinema and fine art and of the documentary film movement in particular. Through his lifelong and passionate engagement with the past, the present and the future of films, Shri Narwekar has touched many a heart, stirred many a soul and ignited many a mind towards the good, the great and the beautiful.

 

Winner of National Award for the Best Book on Cinema in in 1996, Shri Narwekar’s passion for film history has manifested in writing and editing more than 20 books on cinema, including ‘Marathi Cinema in Retrospect’, which won him the Swarna Kamal. He is credited with directing Films Division’s ‘The Pioneering Spirit: Dr. V Shantaram’, a biopic of the legendary film maker, and writing and directing a number of documentaries on varied subjects. He has also served on the selection committee and Jury of many national and international film festivals, including the National Award Jury for Writing on Cinema.

 

The jury is delighted and privileged to recommend this prestigious award in humble recognition of Shri Narwekar’s thought leadership, mentorship and a lifetime of honouring the immaculate beauty of fine art, for gifting us new eyes to see, understand and manifest this beauty in ourselves and in each other.

 


* * *

PIB MIFF Team | Jaydevi PS/T.Pawar/Darshana/MIFF-15

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवातचित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील.  ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk   या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829256) Visitor Counter : 879


Read this release in: English