संरक्षण मंत्रालय

लढाऊ विमान चालकाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 37 अधिकाऱ्यांना 'एव्हिएशन विंग्स' प्रदान


कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत समारंभ संपन्न

Posted On: 25 MAY 2022 7:04PM by PIB Mumbai

 

नाशिक, दि.25 मे 2022

नाशिकरोड येथिल कॉम्बॅट एव्हिएटर्स ट्रेनिंग (कॅट्स) स्कूलमधुन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या 37 अधिकाऱ्यांना कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट बनण्यासाठी प्रतिष्ठित ' एव्हिएशन विंग्स' प्रदान करण्यात आले. भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलटने प्रतिष्ठित एव्हिएशन विंग मिळाल्याने आर्मी एव्हिएशन साठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन आर्मी एव्हिएशनचे महासंचालक आणि कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांनी केले.

नाशिकरोड येथिल कॉम्बॅट एव्हिएटर्स ट्रेनिंग (कॅट्स) स्कूल येथे आयोजित दीक्षांत समारंभात आर्मी एव्हिएशनचे महासंचालक आणि कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलटने प्रतिष्ठित 'एव्हिएशन विंग' मिळवल्यामुळे आर्मी एव्हिएशनसाठी हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांना विमान उड्डाणाचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले.  विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

कॅप्टन आशिष कटारिया यांना एकंदर गुणवत्तेत प्रथम स्थान मिळाल्याबद्दल 'सिल्व्हर चीता' ट्रॉफी आणि 'बेस्ट इन फ्लाइंग'साठी कॅप्टन एसके शर्मा सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. कॅप्टन श्रवण मणिलथया पीएम यांना 'एअर ऑब्झर्व्हेशन पोस्ट - 35' ट्रॉफी ग्राउंड विषयात प्रथम आल्याबद्दल प्रदान करण्यात आली.  प्री आर्मी पायलट कोर्स अनुक्रमांक 35 मध्ये प्रथम राहण्याची ' फ्लेडलिंग ' ट्रॉफी कॅप्टन अभिलाषा बराक यांना देण्यात आली. तसेच बेस्ट इन गनरी साठी ' कॅप्टन पी के गौर ' ट्रॉफी कॅप्टन आर के कश्यप यांना देण्यात आली.

 

अभिलाषा ठरल्या देशातील पहिल्या महिला हवाई सैन्य अधिकारी

भारतीय सैन्यदलात देशातील पहिली महिला हवाई सैन्य अधिकारी पदी विराजमान झाल्या आहेत. अभिलाषा यांना सन्मानाचे 'एव्हिएशन विंग' प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना फ्लेडलिंग ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले आहे. 

आर्मी एव्हिएशन कॉर्प्सने 35 गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत. 2019 मध्ये भारताचे माननीय राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रतिष्ठित राष्ट्रपतींचे 'कलर्स' प्रदान करण्यात आले होते. आर्मी एव्हिएशन हे निर्विवादपणे एक शक्तिशाली शक्ती गुणक आहे, एक प्रमुख लढाऊ सक्षम आणि भारतीय लष्कराची एक महत्त्वाची लढाऊ शाखा आहे.

***

जिमाका वृत्तसेवा, नाशिक

M.Iyengar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828300) Visitor Counter : 147


Read this release in: English