संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नौदलाच्या पश्चिम कमांडच्या प्रमुखांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट

प्रविष्टि तिथि: 24 MAY 2022 9:44PM by PIB Mumbai

मुंबई, 24 मे 2022

 

नौदलाच्या पश्चिम कमांडचे (WNC) प्रमुख, व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी 24 मे 2022 रोजी महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांची मुंबईतील राज्य अतिथीगृहावर भेट घेतली.

नौदलाच्या पश्चिम विभागाच्या मुख्याधिकाऱ्यांनी या भेटीतभारतीय नौदलाच्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या उपक्रमांसह संपूर्ण सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी नौदलाच्या अलीकडील प्रयत्नांची आणि उपक्रमांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त  भारतीय नौदलाद्वारे आयोजित विविध उपक्रमांसह नौदलाच्या नियोजित उपक्रमांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

भारतीय नौदलाच्या भूमिकेविषयी आणि योगदानासंबंधी मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि नौदलाच्या सर्व प्रलंबित समस्या वेळेत सोडवण्याचे मान्य केले.

बैठकीदरम्यान, राज्य सरकार, मुंबईकर आणि भारतीय नौदल यांच्यात घनिष्ठ संवाद वाढवण्यासाठीच्या विविध पर्यायांसह नौदल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील समान हिताच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

 S.Kulkarni/S.Auti/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1828067) आगंतुक पटल : 206
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English