संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा नागपूर दौरा
Posted On:
22 MAY 2022 8:05PM by PIB Mumbai
मुंबई/नागपूर, 22 मे 2022
संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी आज (22 मे 2022) रोजी नागपूर दौरा केला. नागपुरला एअर मार्शल शशिकर चौधरी, AOC- इन- सी व्यवस्थापन कमांड आणि नागरी आणि लष्करी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी आज नागपुरात संरक्षण क्षेत्राच्या विविध पुरवठादारांशी चर्चा केली. यावेळी संरक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली. यात लष्कर, भारतीय नौदल आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक कंपन्यांच्या उपक्रमांचा समावेश आहे.

संरक्षण क्षेत्रातील विविध हितसंबंधीयांशी नागपूर इथे चर्चा केली.संरक्षण तंत्रज्ञानात आत्मनिर्भर भारत बनवण्यावर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच, जगभरातील तंत्रज्ञानाच्या वेगाशी ताळमेळ ठेवावा असा सल्ला त्यांनी दिला. तसेच, कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, योग्य व्यवस्थापन आणि कार्यान्वयन पद्धती कराव्यात अशी सूचनाही त्यांनी केली.
* * *
PIB Mumbai | R.Aghor/Radhika/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1827460)
Visitor Counter : 170