दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार विभागाद्वारे ‘मशीन-टू-मशीन’ या सेवांविषयीची कार्यशाळा
Posted On:
20 MAY 2022 7:57PM by PIB Mumbai
मुंबई, 20 मे 2022
दूरसंचार विभागाच्या मुंबईतील परवानाप्राप्त सेवाक्षेत्र (एलएसए) ने आज म्हणजेच 20 मे 2022 रोजी, एम-टू-एम सेवा म्हणजे मशीन-टू-मशीन सेवांची माहिती देणारी कार्यशाळा आयोजित केली होती.दूरसंचार विभागाने अलीकडेच, एम टू एम सेवा देणाऱ्या घटकांसाठी एक हलक्या स्पर्शाने चालणारी आणि अतिशय सुलभ नोंदणी आराखडा असलेली सुविधा दिली आहे.
मुंबई एलएसए च्या तंत्रज्ञान विभागाचे उप महासंचालक, अजय कमल यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले.आपल्या उद्घाटनपर भाषणात, ते म्हणाले की एसआयएम वर आधारित एम-टू-एम सेवा देणाऱ्या कंपन्यांनी, M2MSP म्हणून नोंदणी करावी, आणि ज्या कंपन्या वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्क चा वापर करतात, त्यांनी, WPAN/WLAN (वायरलेस लोकल एरिया नेटवर्क) तंत्रज्ञान म्हणून, परवानाविरहित स्पेक्ट्रम साठी, WPAN/WLAN जोडण्या प्रदाता म्हणून नोंदणी करावी.
या नोंदणीमुळे त्यांना, TSPs सोबतच्या जोडण्या, KYC (नॉ युवर कस्टमर) माग काढणे आणि सेवा प्रदात्यासाठी इंक्रीप्शन (माहिती/आकडेवारीचे अंकिकरण) अशा सर्व विषयांमधील समस्यांवर तोडगा काढण्यास मदत होईल.
तंत्रज्ञान विभागाच्या मुंबई केंद्राचे संचालक, संजय सेठी यांनी एम-टू-एम नोंदणी प्रक्रियेत अलीकडेच समाविष्ट करण्यात आलेल्या विविध सुविधांची तसेच तंत्रज्ञान विभागाच्या https://saralsanchar.gov.in/ पोर्टलवर, एम-टू-एम सेवा आणि WPAN/WLAN जोडणी प्रदात्याना ऑनलाईन नोंदणी करण्याची पद्धत समजावून सांगितली. दूरसंचार सेवा प्रदात्यानी नोंदणी प्रक्रियेविषयी उपस्थित केलेल्या सर्व शंकांचे निरसन या कार्यशाळेत करण्यात आले.
या वेबिनारमध्ये, मुंबई परिमंडळ क्षेत्रातील सर्व दूरसंचार सेवा प्रदाते आणि मुंबई कार्यालयातील सर्व अधिकारी तसेच तंत्रज्ञान विभागाच्या एनटी शाखेचे अधिकारी सहभागी झाले होते.
* * *
PIB Mumbai | S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1827053)
Visitor Counter : 135