इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सी-डॅकने भारतीय आयसीटी सुलभता मानके प्रकाशित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आणि सी-डॅक, पुणे येथे 19 मे रोजी जागरूकता कार्यशाळा आयोजित
Posted On:
20 MAY 2022 6:18PM by PIB Mumbai
पुणे, 20 मे 2022
ग्लोबल अॅक्सेसिबिलिटी अवेअरनेस डे (जीएएडी) निमित्त, श्री मगेश इथिराजन, महासंचालक, सी-डॅक यांनी “नॉलेज अँड रिसोर्स सेंटर फॉर अॅक्सेसिबिलिटी इन आयसीटी (केएआय)” चा भाग म्हणून पहिल्या ट्रेन-दि-ट्रेनर ह्या २ दिवसांच्या कार्यशाळेचे (१९ आणि २० मे २०२२) उद्घाटन केले. यावेळेस कर्नल अशित कुमार नाथ (निवृत्त), कार्यकारी संचालक-कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि सी-डॅक, पुणे, डॉ. एन. सुब्रमणीयन, वरिष्ठ संचालक (कॉर्पोरेट संशोधन आणि विकास) आणि श्री एस. रामकृष्णन, माजी महासंचालक, सी-डॅक हे उपस्थित होते.
वरील उद्दिष्ट्यांसह, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि सी-डॅक, एसटीक्यूसी आणि बीआयएस सोबत आयसीटी सुलभता मानक तयार करण्यात कार्यरत होते. आयसीटी उत्पादने आणि सेवांसाठी प्रवेशयोग्यता भाग I आवश्यकता (आयएस १७८०२ भाग १) : २०२१ मानक आणि आयएस १७८०२ (भाग २) : २०२२ आयसीटी उत्पादनांसाठी प्रवेशयोग्यता बीआयएस द्वारे अनुक्रमे डिसेंबर २०२१ आणि मे २०२२ मध्ये राजपत्रित (गॅझेटेड) आणि प्रकाशित केली गेली आहेत.
ह्या मानकांच्या प्रकाशनाद्वारे, मानक-आधारित असलेल्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उत्पादनांना सुविधा प्रदान करेल तसेच स्टार्ट-अप, उद्योग आणि संशोधन आणि विकासासाठी नाविन्यपूर्ण सहाय्यक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी संधी निर्माण करेल. हे मानक व्यापक लोकसंख्येसाठी मोबाइल आणि वेबवर आयसीटी सेवा आणि सामग्रीचा अखंड प्रवेश सुलभ करते. हे वेगवेगळ्या दिव्यांग समुदायांना त्यांचे जीवन सुलभ आणि प्रभावी बनवण्यासाठी आयसीटी सुलभता उपायांचा अवलंब करण्यास सक्षम करेल.
सी-डॅक विविध जागरुकता निर्माण, क्षमता विकास आणि ट्रेन-दि-ट्रेनर इव्हेंट्सचा प्रसार, स्वीकृती आणि मानकांच्या अंमलबजावणीसाठी आयोजित करीत आहे.
* * *
PIB Pune | M.Iyengar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1826995)
Visitor Counter : 114