सांस्कृतिक मंत्रालय
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या गोवा संग्रहालयाने साजरा केला आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन
Posted On:
18 MAY 2022 2:31PM by PIB Mumbai
गोवा, 18 मे 2022
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारितील गोवा संग्रहालयाने आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा केला. यानिमित्ताने ओल्ड गोवा, खोर्ली आणि करमळी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी संग्रहालय भेटीचे आयोजन केले होते. याप्रसंगी संग्रहालय अधीक्षक हेमसागर नाईक, सहाय्यक संग्रहालय अधीक्षक डॉ किशोर रघुवंश यांची उपस्थिती होती.
डॉ किशोर रघुवंश यांनी विद्यार्थ्यांना संग्रहालयाचे महत्व समजावून सांगितले. संग्रहालये हे पुस्तकाप्रमाणे असतात. आपण जेवढे अधिक वाचन करु, तेवढे आपल्याला ज्ञान मिळते. संग्रहालये आपला समृद्ध वारसा आणि संस्कृती, कला, स्थापत्यकला आणि परंपरा यांचे दर्शन घडवतात. शालेय विद्यार्थ्यांनी संग्रहालयांना अधिकाधिक भेटी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
नागरिकांमध्ये विशेषतः युवकांना संग्रहालयाचे महत्त्व विशद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाचे आयोजन करण्यात येते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, यावर्षी ‘संग्रहालयांची शक्ती’ ही संकल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करण्यात येत आहे.
SRT/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1826313)
Visitor Counter : 213