परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सकडून मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन

Posted On: 17 MAY 2022 8:48PM by PIB Mumbai

मुंबई, 17 मे 2022

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने  (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स)  नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या संस्थेच्या  सहकार्याने उद्या, 18 मे 2022 रोजी दुपारी 4.30 वाजता नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (NGMA) सभागृहात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचे आयोजन केले आहे. शास्त्रीय गायिका विदुषी गौरी पाठारे यांना पुष्कराज जोशी (तबला) आणि सुप्रिया जोशी (हार्मोनियम) या मैफलीत साथ देणार  आहेत.

हा कार्यक्रम भारतीय कलाकारांना कलेच्या विविध क्षेत्रात त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ देण्यासाठी परिषदेने सुरू केलेल्या 'होरायझन' या मालिकेचा एक भाग आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.

गायिकेविषयी

गौरी पाठारे यांनी किराणा घराण्याच्या पंडित गंगाधरबुवा पिंपळखरेपं.  जितेंद्र अभिषेकी आणि पंडिता पद्माताई तळवलकर यांच्याकडून गायनकलेचे प्रशिक्षण घेतले आहे. 2010 पासून, त्या जयपूर घराण्याचे पं.अरुण द्रविड यांच्याकडून  प्रशिक्षण घेत आहेत.

S.Kulkarni/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826153) Visitor Counter : 95


Read this release in: English