आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध असलेल्या कोविड-19 प्रतिबंधक मात्रांविषयी अद्ययावत माहिती


राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 193.53 कोटीहून अधिक कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा केल्या उपलब्ध

अजूनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे कोविड विरोधी लसीच्या शिल्लक आणि न वापरलेल्या 17.31 कोटीहून अधिक मात्रा उपलब्ध

Posted On: 16 MAY 2022 12:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2022

देशभरात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती जलद गतिने वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. 16 जानेवारी 2021  रोजी देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरणास सुरूवात करण्यात आली. 21  जून 2021 पासून कोविड -19  प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा  टप्पा सुरू झाला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात सुयोग्य नियोजन शक्य व्हावे आणि लसींच्या पुरवठा साखळीचे सुव्यवस्थित नियोजन करता यावे यासाठी लसींची अधिक उपलब्धता  आणि साठ्याबाबत  अगोदरच सूचना देऊन लसीकरण अभियानाला गती देण्यात येत आहे.

देशव्यापी लसीकरणाच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19  प्रतिबंधक लसींचा पुरवठा विनामूल्य करत आहे. कोविड-19  प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्यात, केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांकडून उत्पादित  75  टक्के लसींच्या मात्रांची खरेदी करून  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामुल्य पुरवठा करत आहे.

VACCINE DOSES

 

(As on 16thMay 2022)

 

SUPPLIED

 

1,93,53,58,865

 

BALANCE AVAILABLE

 

 

17,31,18,435

भारत सरकारने आतापर्यंत 193.53 कोटी हून अधिक  (1,93,53,58,865) कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रांचा पुरवठा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना केला आहे.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 17.31  कोटीहून अधिक (17,31,18,435) शिल्लक राहिलेल्या आणि न वापरलेल्या लसींच्या मात्रा टोचण्यासाठी उपलब्ध आहेत.  

 

 

 

 

N.Chitale/U.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 


(Release ID: 1825725) Visitor Counter : 181