आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 प्रतिबंधक लसीची राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील उपलब्धतेची अद्ययावत माहिती


राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 193 कोटी 53 लाखापेक्षा जास्त लस मात्रा केल्या उपलब्ध

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप  17 कोटी 35 लाखापेक्षा जास्त न वापरलेल्या उपयुक्त  लस मात्रा शिल्लक

Posted On: 15 MAY 2022 12:47PM by PIB Mumbai

 

देशात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी  कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण  16 जानेवारी 2021 रोजी सुरु झाले. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा  नवा टप्पा  21 जून  2021 रोजी सुरु झाला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करता यावे आणि लसीची पुरवठा साखळी  सुनियोजित करता यावी यासाठी लसीची अधिक उपलब्धता आणि लसींच्या साठ्याविषयी आगाऊ सूचना  देऊन लसीकरण मोहिमेची गती वाढवण्यात आली. 

देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा पुरवठा विनामूल्य करत आहे. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात, केंद्रसरकार देशातील लस उत्पादकांनी तयार केलेल्या 75% लसी खरेदी करून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य) पुरवत आहे.

VACCINE DOSES

 

(As on 15thMay 2022)

 

SUPPLIED

 

1,93,53,58,865

 

BALANCE AVAILABLE

 

 

17,35,69,285

 

केंद्र सरकारने आतापर्यंत सुमारे  193 कोटी 53  लाखापेक्षा जास्त (1,93,53,58,865) लस मात्रा  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि राज्यांद्वारे थेट खरेदी प्रक्रियेच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. 

17 कोटी 35 लाखापेक्षा जास्त (17,35,69,285) न वापरलेल्या उपयुक्त कोविड प्रतिबंधक लस मात्रा  अद्याप राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.  

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825487) Visitor Counter : 174