नौवहन मंत्रालय

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री मीनाक्षी लेखी, यांच्या उपस्थितीत, “सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांचा आंतरराष्ट्रीय महिला दिन” कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ मुंबईतील एमटी स्वर्ण गोदावरी या जहाजावर संपन्न


ज्या महिलांनी, खलाशी हे करियर निवडले, त्यांनी चाकोरी मोडून नवे मार्ग स्वीकारले आहेत - परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री

Posted On: 14 MAY 2022 5:49PM by PIB Mumbai

 

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते आजसागरी क्षेत्रात कार्यरत, महिलांचा आंतरराष्ट्रीय  महिला दिनाचे औचित्य साधून झालेल्या समारंभाचे मुंबईत उद्घाटन झाले. भारतीय जहाजबांधणी महामंडळाच्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.

आजचा हा समारंभ विशेष होता कारण, गेल्याच वर्षी म्हणजे 2021 साली संयुक्त राष्ट्र सागरी संस्थेने, 18 मे हा सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसाठीचा दिन म्हणून जगभर साजरा केला जावा, असा ठराव मंजूर केला होता. याचे औचित्य साधून हा विशेष कार्यक्रम आज साजरा करण्यात आला.

जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत, याशुकाता फुकाहोरी हे ही या समारंभाला उपस्थित होते. त्याशिवाय, भारतीय जहाजबांधणी महामंडळाच्या महिला अधिकारी आणि एमटी स्वर्ण गोदावरी या जहाजांवरील महिला खलाशांचा चमू देखील यावेळी उपस्थित होता.

 

 

यावेळी मीनाक्षी लेखी यांनी, भारतीय जहाजबांधणी महामंडळाच्या महिला अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी कॅडेट्ससह जहाजवरच योगाभ्यास करुन, योग उत्सव 2022 मध्ये सहभाग नोंदवला. आंतरराष्ट्रीय योगदिनाची उलटगणती आता सुरु झाली असून, त्यानिमित्त देशभर योग उत्सव साजरा केला जात आहे. भर समुद्रात एमटी स्वर्ण गोदावरी जहाजावरच, मंत्री महोदया आणि अधिकाऱ्यांनी योगाभ्यास करुन, आगळ्यावेगळ्या पद्धतीने समारंभ साजरा केला. 

भारतीय जहाजबांधणी महामंडळाने, सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांच्या पहिल्या आतंरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत, या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आता दरवर्षी 18 मे रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे. सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान, तसेच या क्षेत्रात अधिकअधिक महिलांच्या भरतीला प्रोत्साहन देण्यासह, या पुरुषप्रधान व्यवसायात, महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जाणार आहे. या क्षेत्रात, महिला सध्या केवळ दोनच टक्के असून, त्यात, लक्षणीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा यावेळी लेखी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा भाग म्हणून पाचवे उद्दिष्ट- लिंगभेद समानता साध्य करण्यासाठी तसेच, सागरी उद्योगात, सध्या असलेली स्त्री पुरुष असमानता दूर करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी भारतीय नौदलात महिलांची संख्या सर्वाधिक म्हणजे 6.5% असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले सामर्थ्य, कर्तृत्व सिद्ध केले असून खलाशी हा व्यवसायही त्याला अपवाद नाही, असे त्या म्हणाल्या. याच मुद्दयाबद्दल बोलतांना त्यांनी नाविका सागर परिक्रमेचेउदाहरण दिले. भारताच्या सर्व महिला खलाशांनी भारतीय नौदलाच्या तारिणीया जहाजवरून जगाची सागरी सफर यशस्वीपणे पूर्ण केली होती. 1957 साली, भारतीय महिला, सुमाई मोराजी यांनी जहाजमालकांच्या संघटनेचे प्रमुखपद स्वीकारून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे, याचा गौरवपूर्ण उल्लेख  लेखी यांनी केला. त्या काळात, इतक्या मोठ्या देशांतही, अशी परंपरा नव्हती. भारताने हा निर्णय घेत नवी आधुनिक परंपरा निर्माण केली. असे त्या पुढे म्हणाल्या. याचाच संदर्भ पुढे नेत, त्या म्हणाल्या की आपला समाज प्रागतिक आहे. भारतात महिला आणि पुरुषांना समानतेची वागणूक आणि सन्मान देण्याची जुनी परंपरा आहे.

यावेळी लेखी यांनी, उल्लालच्या राणी अबकका यांचा उल्लेख करत, त्यांनी पोर्तुगीजांशी केलेल्या लढाईचे वर्णन केले, तसेच, झाशीची राणी लक्ष्मीबाई, यांनीही आपल्या पाठीवर मूल बांधून  इंग्रजांशी युद्ध केले. समाजात असलेल्या मोकळेपणामुळेच झाशीच्या राणीला हे युद्धकौशल्य शिकणे सोपे गेले..

जहाजांना किंवा नौकांनाही ती नौकाअसे म्हटले जाते, असाही उल्लेख केला, यामागची कल्पना अशी असेल माता किंवा देवता, आपल्या जहाजाप्रमाणेच, मोठे सामर्थ्य असलेल्या हव्यात. महिलांसाठी सागरी सफारीचे नेतृत्व करणे, सोपे आहे, असे त्या म्हणाल्या.

महिला खलाशांचे अभिनंदन करत, मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, की तुम्ही, सामर्थ्य, धैर्य साहसाचे जिवंत प्रतीक आहात. ज्या महिलांनी खलाशी हे करियर म्हणून स्वीकारले आहे, त्यांनी जुन्या चौकटी मोडल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या. आज आपण सगळे जण अमृतमहोत्सव साजरा करत असताना, एक समाज म्हणून आपण असा संकल्प करायला हवा, की आपल्या महिलांना त्यांच्या आवडीची जहाजबांधणी क्षेत्रासारखी साहसी क्षेत्रे निवडता यावीत यासाठी प्रोत्साहन देऊ, आणि जमेल तेवढी मदत करु. केंद्र सरकार आणि जहाजबांधणी महामंडळ सर्व मुलींना समान संधी आणि सुरक्षितता देण्यासाठी सातत्याने परिश्रम करत आहेत, असे त्यांनी सांगितले. जहाजबांधणी महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, एच. के जोशी आणि इतर महिला अधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

***

S.Tupe/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825403) Visitor Counter : 180


Read this release in: English