दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम-वाणी योजनेमध्ये डिजिटल भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी परवडणाऱ्या ब्रॉडबँड सुविधेच्या प्रसारासाठी प्रचंड क्षमता आहे


महाराष्ट्रातील दूरसंचार विभागाद्वारे आयोजित पीएम-वाणी योजनेच्या क्षमतेबाबत वेबिनार

Posted On: 13 MAY 2022 7:57PM by PIB Mumbai

मुंबई, 13 मे 2022

दूरसंचार विभागाद्वारे सुरू करण्यात आलेल्या पीएम-वाणी  योजनेचा उद्देश ब्रॉडबँड इंटरनेट सेवांच्या प्रसाराला गती देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात सार्वजनिक डेटा ऑफिसेस (PDOs) द्वारे सार्वजनिक वाय-फाय सेवा प्रदान  करण्यासाठी सार्वजनिक डेटा ऑफिस एग्रीगेटर्स (PDOAs) द्वारे सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क उभारणे  हे  आहे. दूरसंचार विभाग-मुंबई आणि महाराष्ट्र परवानाधारक सेवा क्षेत्रे यांनी आज आयोजित केलेल्या या विषयावरील वेबिनारमध्ये महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांतील बीएसएनएल  (भारत संचार निगम लिमिटेड) आणि त्यांच्या टीआयपी  (टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर) चे अधिकारी उपस्थित होते.

वेबिनारचे उद्घाटन  दूरसंचार विभाग, महाराष्ट्र एलएसएचे  उपमहासंचालक (तंत्रज्ञान) विक्रम मालवीय  यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी नमूद केले की, डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी पीएम -वाणी  योजनेमध्ये परवडणाऱ्या ब्रॉडबँड सुविधेच्या प्रसारासाठी अफाट क्षमता आहे. पीएम-वाणी चौकटीच्या  नियमांच्या  आधारेबीएसएनएल , टीआयपीला सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट्स उभारण्यासाठी  आणि स्वतःसाठी अतिरिक्त महसूल निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करेल. ते पुढे म्हणाले की बीएसएनएल दोन्ही शहरी आणि ग्रामीण भागांच्या गरजा पूर्ण करण्याच्या सुस्थितीत आहे.

दूरसंचार विभाग, महाराष्ट्र एलएसएचे  संचालक (तंत्रज्ञान) संजय सेठी  यांनी पीएम वाणीची पार्श्वभूमी आणि विविध घटक उदा .  सेंट्रल रजिस्ट्री,पीडीओ, पीडीओए  आणि अॅप यांची माहिती दिली. पीएम वाणी  संबंधी टीआयपी द्वारे उपस्थित केलेल्या सर्व शंकांना दूरसंचार विभाग आणि बीएसएनएलच्या चमूने  उत्तरे दिली.

पीएम वाणी  बद्दल

राष्ट्रीय डिजिटल दळणवळण योजनेनुसार, केंद्र सरकारने 2022 पर्यंत 10 दशलक्ष वाय-फाय हॉटस्पॉट्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि पीएम-वाणी  योजना यात मदत  करेल.

सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी पीडीओला दूरसंचार विभागाकडून कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही.

पीएम वाणी द्वारे देशात सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कचा प्रसार वाय-फाय नेटवर्कद्वारे सार्वजनिक ब्रॉडबँड सेवांच्या प्रसाराला गती देईल आणि यामुळे स्थानिक उद्योजक जसे की चहावाला , किराणा दुकाने  आणि  उपहारगृहांना  अतिरिक्त महसूल मिळवता येईल.

इच्छुक संभाव्य पीडीओ पुढील  लिंकवर चौकशी करू शकतात: www.pmwani.gov.in

दूरसंचार विभाग सर्व संबंधितांना पीएम वाणीच्या अंमलबजावणी आणि प्रसारासाठी मदत करेल.

 

 

 

 

S.Patil/S.Kane/ P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1825195) Visitor Counter : 249


Read this release in: English